मुंबई : आपण परिधान केलेले कोणतेही कपडे तेव्हा परिपूर्ण वाटतात जेव्हा आपण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष देतो. आपल्या कपड्यांच्या रंगानुसार आपण इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
हे देखील पहा -
काहीवेळा आपण चांगले तयार होतो, पण त्याच्या फुटवेअरकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांचा संपूर्ण लुकच बिघडतो. फूटवेअर निवडताना आपण आपल्या आउटफिटच्या शैलीकडे देखील लक्ष दिले पाहिजे. जर आपण वन पीस सारखा ड्रेस कॅरी करत असू तर त्यावर कोणते फूटवेअर घालायचे हे आपण पाहूया
या पध्दतीने फूटवेअरची खरेदी (Shopping) करा.
१. वन पीस आपण कॅरी करत असून तक त्यावर स्ट्रॅपी हील्स छान दिसतात. स्ट्रॅपी हील्स घालताना आपण को-ऑर्डर लुक कॅरी करू शकतो. आपल्या आउटफिटशी जुळणार्या स्टाईल हील्स नाहीतर काळ्या रंगाच्या स्ट्रॅपी हील्स प्रत्येक पोशाखासोबत चांगल्या दिसतात.
२. कॅज्युअलमध्ये वन पीस घालत असू तर आपण टाचांच्या सँडलची स्टाईल करू शकतो. यामध्ये आपल्याला अनेक रंग आणि पॅटर्न मिळतील, जे आपल्या आउटफिटच्या रंगानुसार आपण निवडू शकतो. टाचांचे कोणतेही सँडल हेवी असले तरी त्यांना कॅज्युअलमध्ये घालण्याची स्टाइल असते. आपण अशावेळी आपल्या आवडीनुसार स्ट्रॅप सँडल घालू शकता.
३. वन पीस घालताना आपल्या आणखी एक पर्याय आहे. आपण पार्टीला (Party) किंवा डिनर डेटवर जात असू तर त्यावेळी पंप घालू शकतो. आपल्या लुकला आकर्षक ठेवण्यासाठी मॅचिंग पंप निवडण्याचा प्रयत्न करा.
४. स्ट्रीप असलेले पंप हे फूटवेअर आजकाल खूप ट्रेंडमध्ये (Trend) आहे. महिलांना पार्टी लुकमध्ये स्ट्रॅप फूटवेअरसह पंप घालणे अधिक आवडते. वन पीस सारख्या ड्रेसवर याचा वेगळा लुक येतो.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.