भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) स्पॅम आणि फेक कॉल्सला आळा घालण्यासाठी सतत काम करत आहे. काही दिवसांपूर्वीच, नवीन दूरसंचार नियम लागू झाले होते, जे बनावट आणि स्पॅम कॉलला आळा घालण्याच्या उद्देशाने सरकारी संस्थेने आणले होते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने जिओ, एअरटेल आणि वोडाफोन - आयडियाला स्पॅम कॉल आणि बनावट संदेश थांबवण्याचे आदेश दिले होते. यासाठी १ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्याचा विचार केला जात आहे.
ट्राय प्रमुख म्हणाले की, आमची टीम गेल्या 2 महिन्यांपासून यावर काम करत आहे. भारतीय नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी आम्ही सतत नवीन पावले उचलत आहोत. परंतु आम्हाला वाटते की नेटवर्क दुरुस्त करण्यासाठी आम्हाला आणखी थोडा वेळ हवा आहे. तसे झाल्यास 31 डिसेंबरची डेडलाइन निश्चित केली जाऊ शकते. म्हणजेच जानेवारीपासून नवा नियम लागू होणार आहे. अशा स्थितीत ती काही काळ वाढवली जाऊ शकते. नवीन नियम लागू झाल्यानंतर अशा कॉल्सवर अधिक कठोरता करण्यात येईल. ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना मेसेज ट्रेसिबिलिटी लागू करण्यास सांगितले आहे. मात्र, टेलिकॉम कंपन्यांनी यावर आक्षेप नोंदवला असून असे केल्यास त्यांच्या कामकाजावर परिणाम होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
TRAI ने स्पष्ट केले आहे की नवीन टेलिकॉम नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहेत, परंतु सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. संदेश ट्रेसिबिलिटी लागू झाल्याने त्यांचे काम अवघड होऊन अनेक गोष्टींवर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका अहवालानुसार, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने नवीन नियम लागू करण्यासाठी TRAI कडे काही वेळ मागितला आहे. दूरसंचार कंपन्यांनी सांगितले की, ''हे नियम घाईघाईने लागू करण्याऐवजी त्यांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने व्हावी, अशी आमची इच्छा आहे.'' असे करण्यामागे दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे आहे की अनेक टेलिमार्केटर आणि अनेक मोठ्या संस्था या नवीन नियमाचे पालन करण्यास तयार नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.