Health: लठ्ठपणा आणि मधुमेह  कमी करायचा का? दररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे

walk for diabetes and obesity loss: फिट राहण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळण्याची गरज नाही.  तुम्ही रोज फक्त ३० मिनिटे चालून स्वतःला निरोगी ठेवू शकता. दररोज ३० मिनिटे चालण्याचे फायदे जाणून घेऊया.
walking
walkingyandex
Published On

चालणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि अनेक प्रकारच्या समस्या टाळण्यास देखील मदत करू शकते. दररोज फक्त ३० मिनिटे चालणे तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?  आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपले आरोग्य मागे पडत असते.  पण, नियमित चालणे हा या समस्येवर सोपा आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. 

हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान

दररोज ३० मिनिटांच्या चालण्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. हे रक्त परिसंचरण सुधारते आणि हृदयाच्या स्नायूंना मजबूत करते.

वजन कमी करण्यास उपयुक्त

नियमित चालण्याने कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊन यामुळे चयापचय वाढवतो. आणि शरीर अधिक कॅलरी बर्न करते. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.

मधुमेहाचा धोका कमी होतो

टाइप-2 मधुमेह टाळण्यासाठी दररोज ३० मिनिटे चालणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हाडे आणि स्नायू मजबूत होतात

चालण्याने हाडे आणि स्नायू मजबूत होतात ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखी सारख्या समस्या टाळता येतात.

ताण कमी होतो

रोज चालण्याचा व्यायाम केल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत करते. मूड आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

पचनसंस्था निरोगी ठेवते-

नियमित चालण्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

प्रतिकारशक्ती वाढवते

रोज चालण्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, त्यामुळे तुम्ही रोगांशी चांगल्या प्रकारे लढू शकता.

walking
Woman Safety : मुलींच्या मोबाईलमध्ये 'हा' ॲप आहे का? नसेल तर सुरक्षिततेसाठी आताच करा इन्स्टॉल

यागोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत

वेळेकडे लक्ष द्या- वायू प्रदूषण वाढल्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी जास्त चालणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे सकाळी ८ ते ९ वाजल्यानंतर चालणे चांगले.

डॉक्टरांचा सल्ला- तुम्हाला आरोग्याची कोणतीही समस्या असल्यास चालायला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

आरामदायक कपडे - गुदमरल्यासारखे होऊ नये आणि दुखापत होण्याचा धोका कमी करण्यासाठी आरामदायक कपडे आणि शूज घाला.

पाणी प्यायला जवळ ठेवा- चालताना पाणी प्यायला ठेवा, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये.

स्ट्रेचिंग करा - चालल्यानंतर हलके स्ट्रेचिंग करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

walking
Heart Attack: हिवाळ्यात वाढतं हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण; कारण काय?

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com