प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. प्रेमात व्यक्ती काय करतो आणि काय नाही याचा त्यांना स्वतःला काहीच नेम नसतो. मात्र जेव्हा आपलं प्रेम तुटतं, ब्रेकअप, घटस्फोट होतो त्यावेळी या सर्वातून बाहेर पडताना सर्वांनाच त्रास होतो. त्यामुळे आज प्रेम प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे याबाबत जाणून घेऊ.
भेटण्याचा प्रयत्न करू नका
प्रेमात आपल्या त्या व्यक्तीसोबत बऱ्याच आठवणी जोडलेल्या असतात. आठवणी विसरणे फार कठीण होते. अशात एकदा भेटल्यावर सर्व काही भांडणे मिटतील असं काही व्यक्तींना वाटतं. मात्र ब्रेकअप झाल्यावर तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटणे टाळले पाहिजे. भेटल्याने तुम्हाला त्याला विसरणे आणखी कठीण होते.
त्या व्यक्ती बद्दल बोलणं टाळा
जर तुमचं ब्रेकअप किंवा घटस्फोट झाला असेल तर त्या व्यक्तीला पूर्णतः विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करा. तुमचे कुटुंबीय मित्र मैत्रिणी यांना सर्वांना याबाबत सांगा. तसेच कोणत्याही कारणावरून त्या व्यक्तीचा विषय काढू नका. त्याच्याबद्दल बोलणं पूर्णतः टाळा.
जवळच्या व्यक्तीला तुमचं दुःख सांगा
बऱ्याच व्यक्ती आपलं दुःख मनात साठवून ठेवतात. मात्र आपल्या मनातील दुखः इतरांशी शेअर केल्यावर तुम्हाला मन हलकं वाटेल. समोरच्या व्यक्तीसाठी रडल्यवर देखील दुःख कमी होतं असं म्हणतात. मनातलं दुःख तुमच्या जवळच्या विश्वासू व्यक्तीबरोबरच शेअर करा.
सत्य परिस्थिती स्वीकारा
कोणत्याही गोष्टीवर कंट्रोल मिळवण्यासाठी तुमचं मन स्ट्राँग असायला हवं. त्यासाठी प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी स्वीकारा. त्याने पुढील निर्णय घेणे सोप्पे होईल. सत्य नाकारून तुम्हालाच जास्त त्रास होत राहील. अनेक व्यक्ती असलेल्या गोष्टी बदलण्याचा फार प्रयत्न करतात आणि त्या नात्यात आणखी गुंतत जातात. मात्र तसे न करता तुम्ही मनाची समजूत काढली पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.