Home Remedies For Constipation : पोटात पित्ताचा दोष झाल्याने पोटाच्या अनेक समस्या निर्माण होतात. आजकाल ही एक सामान्य समस्या झालेली आहे. रोज सकाळी पोट साफ होण्यास अडचणी येणे हे बद्धकोष्टिकेची समस्या असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पचनच्या संबंधित समस्या उद्भवल्याने पोटदुखी, मळमळ, उलट्या आम्लपित्त, अपचन या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच जर पोट साफ नाही झाले तर काही खावेसे वाटत नाही त्याचा परिणाम इतर आरोग्यावरही होतो. तुम्हालाही दररोज पोट (Stomach) साफ करण्यासाठी त्रास होत असेल तर या पद्धतीचा अवलंब करा.
पाणी आणि सैंधव मीठ -
पाणी (Water) हे आरोग्याच्या कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. दररोज आठ ते बारा ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. त्यामुळे पोट साफ करण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा रॉक मीठ आणि गुलाबी मीठ मिक्स करून हे पाणी पिल्याने शरीरातील आतडे पूर्णपणे स्वच्छ होतात आणि तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळते.
हर्बल टी -
एक कप हर्बल टी पिऊन तुम्ही या समस्येपासून सुटका करू शकता. या चहाचे सेवन करून तुम्हाला ऍसिडिटी आणि बद्धकोष्टता दूर करण्यास सहकार्य मिळते. याचा वापर करून तुम्ही पोटाच्या समस्या कमी करू शकता.
फायबर महत्वाचे आहे -
जर तुमच्या आहारात मैदा आणि जंग फूड चा जास्त समावेश असेल तर बद्धकोष्ठता होणे साहजिक आहे. त्यामुळे फायबरयुक्त अन्न खाणे गरजेचे आहे. ज्याने तुमचे पोट स्वच्छ राहते, लठ्ठपणा कमी होईल त्यासोबतच इतर आजाही होणार नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.