प्रथमच आई होताय; मग गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी

डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेचे पहिले तीन महिने प्रत्येक महिलेसाठी खूप खास असतात.
प्रथमच आई होताय; मग गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी
प्रथमच आई होताय; मग गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी saam tv
Published On

प्रथमच आई होण्याची भावना खूप खास आणि वेगळी असते. पहिल्या गर्भधारणेच्या (Pregnancy) काळात आईला प्रत्येक गोष्ट नवीन वाटत असली तरी ती आतून थोडी घाबरलेली आणि थोडी आनंदीही असते. मात्र घरात ज्येष्ठ आणि अनुभवी महिला नसतील तर स्त्रियांना अनेकदा काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नसतात. परंतु प्रत्येक स्त्रीला स्वत: च्या आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी (Baby health) या गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. (The first three months of pregnancy are extremely important)

प्रथमच आई होताय; मग गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी
माना, श्रीहरी आणि साजन यांची टोकियो ऑलम्पिकसाठी निवड

गर्भधारणेतील नऊ महिने सर्वात शेवटी आलेल्या मासिक पाळीच्या (Menstruation) पहिल्या दिवसापासून मोजले जातात. हे 9 महिने (9 Month) तीन तिमाहीत (Three quarters) विभागले गेले आहेत. डॉक्टरांच्या मते, गर्भधारणेचे पहिले तीन महिने प्रत्येक महिलेसाठी खूप खास असतात. या काळात थोडी काळजी घेतल्यास जन्माला येणारे बाळ वेळेच्या आधी म्हणजेच अकाली आणि शारीरिकदृष्ट्या अपंगही जन्मणार नाही.

गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी
गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी saam tv

पहिल्यांदाच आई होणाऱ्या स्त्रियांनी गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यांत आहारापासून रूटीन चेकअपपर्यंत ही काळजी घेतलीच पाहिजे

- गर्भधारणेचे पहिले तीन महीने

9 महिने तीन तिमाहीत विभागले आहेत. पहिले तीन महिने पहिल्या तिमाहीच्या टप्प्यात येतात. या काळात गर्भाशयात गर्भाचा विकास सुरू होतो. या काळात एका स्त्रीचे शरीर बर्‍याच शारीरिक आणि हार्मोनल बदलांमधून जात असते. हे महिने देखील सर्वात कठीण दिवस असतात. या महिन्यांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे याकाळात सर्वात जास्त काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय घेतलेली औषधे आपल्या आणि बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. बाळमध्ये स्ट्रक्चरल डिसऑर्डर उद्भवू शकतात. यासाठी पहिली तीन महिन्यात डॉक्टर स्त्रियांना फॉलिक अॅसिड घेण्याचा सल्ला देतात.

- या गोष्टी लक्षात ठेवा

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये कोणत्याही स्त्रीने जास्त गर्दी, प्रदूषण आणि रेडिएशन असलेल्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. याशिवाय खडबडीत रस्त्यावर प्रवास करणे, जास्त वेळ रिकाम्या पोटी राहणे आणि तिखट पदार्थांचे सेवन करणे देखील टाळले पाहिजे. या काळात स्त्रियांनी थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खाणे गरजेचे आहे. याशिवाय फळं, नारळपाणी किंवा ग्लूकोज मिश्रित पाणी इत्यादी घेत राहावे.

गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी
गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी saam tv

- आहाराचीही काळजी घ्या

सकाळचा अशक्तपणा टाळण्यासाठी लिंबू-पाणी किंवा आल्याचा चहा प्याला जाऊ शकतो. दिवसातून किमान 3-4 वेळा पातळ पदार्थ, जसे की, ताक, लिंबू पाणी, नारळाचे पाणी, फळांचा रस किंवा शेक यांसारखी यांचे सेवन करायला हवे. असे केल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. या तीन महिन्यांत, बाळाचे अवयव तयार होण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत आपल्या आहारात जास्तीत जास्त पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.

गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी
गर्भधारणेचे पहिले तीन महीने घ्या अशी काळजी saam tv

-रुटीन चेकअप

- जन्मपूर्व तपासणी चाचण्या (रक्तगट व आरएच, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, संक्रमणाची तपासणी - एचआयव्ही, सिफलिस, रुबेला, हेपेटायटीस सी, हिमोग्लोबिनोपॅथी) नियमितपणे कराव्यात. दर 15 दिवसांनी आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

- यूएसजी करून घेणे, या चंचणीमुळे आईला आपल्या डिलिव्हरीच्या तारखेसह गर्भाशयात एक बाळ आहे की दोन (जुळी) आहेत,. याची माहिती मिळते.

- गर्भातील बाळामध्ये काही गडबड आहे का ते पाहण्यासाठी सातव्या आणि बाराव्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड केला जातो. बाराव्या आठवड्यात डबल मार्कर रक्त तपासणी केली जाते.

Edited By- Anuradha

टीप - या लेखात दिलेली माहिती अचूकता, सत्यतेची खात्री करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. आमचा उद्देश आपल्याला केवळ माहिती प्रदान करणे हा आहे. त्यामुळे, कोणताही उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी आमची नम्र विनंती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com