How To Choose Right Type Of Bra
How To Choose Right Type Of Bra Saam Tv

How To Choose Right Type Of Bra : रोजच्या अनकंफर्टेबल ब्राने होताय त्रस्त? योग्य प्रकारची ब्रा कशी निवडाल? फॉलो करा 'या' टिप्स

Choose Right Type Of Bra : चांगल्या प्रकारची ब्रा निवडणे खूप अवघड आहे.
Published on

Bra Types For Regular Use : चांगल्या प्रकारची ब्रा निवडणे खूप अवघड आहे. चुकीची ब्रा निवडली तर त्याचा त्रास दिवसभर होत राहतो. महिला कधी मॅचिंग कपड्यांसारखे तर कधी फॅशनच्या नावाखाली बऱ्याच वेळा चुकीची ब्रा घालतात.

त्यामुळे त्यांना पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी सारख्या समस्या उद्भवतात. केवळ ब्रा खरेदी करण्याचे नियम माहित नसल्यामुळे ही चूक होत असते बऱ्याच वेळा खूप पैसे (Money) खर्च करून महागड्या ब्रा घेतल्या तरी कम्फर्ट मिळत नाही. तुम्हालाही या समस्या येत असतील तर हा लेख वाचून तुम्ही पुढच्या वेळी योग्य योग्यरीत्या ब्रा खरेदी करू शकाल.

How To Choose Right Type Of Bra
National Bra Day : ब्रा बद्दलच्या अनोख्या गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?

कोणती ब्रा योग्य आहे -

तुमचे स्तन जर जड असतील तर तुम्ही सामान्य ब्राचा वापर न करता स्पोर्ट्स (Sports) ब्राची निवड केली पाहिजे. स्पोर्ट्स ब्रा स्तनांना पूर्णपणे आधार देतात. त्यामळे तुम्हाला आरमदाय वाटण्यास मदत मिळते. या ब्रा मुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वाईट दिसणाऱ्या परिस्थितीपासून वाचवतात.

चुकीच्या ब्रा मुळे स्तनावर वाईट परिणाम होतो -

चुकीच्या ब्रा घातल्याने स्तनाच्या आकारवर परिणाम होतो. ब्रा मधील हुक्क, क्लिप्स खूप वेळा अस्वस्थ करतात. बऱ्याच वेळा रक्तभीसरणात अडथळे निर्माण करतात. तसेच खाज सुटणे, पुरळ उठणे इत्यादी समस्या येतात.

स्पोर्ट्स ब्रा म्हणजे जिमवेअर नाही -

भरपुर मुलींना असे वाटते की स्पोर्ट्स ब्रा फक्त जिमसाठी आहे म्हणून स्पोर्ट्स ब्रा वापरण्याकडे दुर्लक्ष करतात.पण असे नसून तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालून कंफ्टेब्ल राहू शकता.स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

How To Choose Right Type Of Bra
No bra day साजरा करू, तेव्हा हेमांगीने सहभागी व्हावं - तृप्ती देसाई

स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा -

  • काही महिलांना असे वाटते की स्पोर्ट्स ब्रा खूप घट्ट असतात, पण जेव्हा तुम्ही त्या योग्य प्रकारे खरेदी करतात तेव्हा तुम्हाला आरामदायक वाटतील.

  • स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना आधी तपासणी केली पाहिजे.त्यासाठी तुमच्या बोटांवरील स्ट्राप्स फिट आहे का तपासा जर दोन्हीही बोट जुळत नसतील तर याचा अर्थ ते खांद्यावर लूज पडेल.

  • स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना ब्राच्या पट्ट्या नेहमी मागच्या बाजूला सरळ आहेत का बघितले पाहिजे. जर तुम्ही हात वर केला तेव्हा ते वर गेले तर याचा अर्थ असा होतो की ब्राचा आकार चुकीचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com