Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

broccoli different dishes in winter: हिवाळ्यात ब्रोकोली खाण्याचे अनेक फायदे आहेत.  यामुळे शरीर मजबूत होते आणि ते निरोगी राहण्यासही मदत होते. थंडीच्या दिवसात ब्रोकोली जरूर खावी. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत, जेणेकरुन तुम्ही संपूर्ण हिवाळ्यात निरोगी राहाल.
Broccoli
Broccoliyandex
Published On

ब्रोकोली ही एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही. ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक आढळतात.  ब्रोकोली केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते असे नाही तर ते आपल्या हृदयाच्या आरोग्याची देखील चांगली काळजी घेते.  थंडीच्या दिवसात ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्यास दिवसभर फ्रेश वाटेल.  विशेष म्हणजे ब्रोकोली अनेक आजारांपासूनही तुमचे रक्षण करेल. 

ब्रोकोली सॅलेड

कोशिंबीर म्हणून ब्रोकोली सहज खाता येते. तुम्ही ते हलकेच उकळू शकता किंवा सलाडमध्ये कच्चे घालू शकता. ब्रोकोली सॅलेड बनवण्यासाठी टोमॅटो, काकडी, गाजर आणि लेट्युस चिरून घ्या. आता वर ब्रोकोली आणि ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस घालून एक स्वादिष्ट सॅलड तयार करा. तुम्ही त्यात ओरेगॅनो किंवा चिली फ्लेक्सही घालू शकता. हे उत्कृष्ट डिटॉक्स सलाड बनवेल. हे खाल्ल्याने तुमची पचनक्रियाही निरोगी राहते.

ब्रोकोली चिला

जर तुम्हाला थंडीच्या दिवसात नाष्ट्यासाठी पराठा किंवा चीला खावासा वाटत असेल तर तुम्ही ब्रोकोलीचा चिला बनवू शकता. ब्रोकोली बारीक चिरून किंवा बारीक करून पीठात मिसळा, नंतर पराठा बनवा. बेसनामध्ये ब्रोकोली मिसळूनही तुम्ही चीला बनवू शकता. मुले आणि प्रौढ दोघांनाही ते खूप आवडेल. हे खाण्यास चविष्ट तर असेलच, पण आरोग्यदायी आणि पौष्टिकही असेल.

ब्रोकोली स्मूदी

हे थोडं विचित्र वाटेल पण स्मूदीजमध्ये ब्रोकोलीचाही समावेश केला जाऊ शकतो.  पालक, केळी आणि सफरचंद सह ब्रोकोली बारीक करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हलके मीठ किंवा साखर वापरू शकता. तुम्ही त्यात मधही घालू शकता.आता वरती काही बदाम किंवा चिया बियांनी सजवा. तुमची स्मूदी तयार आहे. ही ऊर्जा वाढवणारी स्मूदी आहे जी वजन कमी करण्यास देखील मदत करते.

Broccoli
Mental Health: मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा आहारात समावेश

ब्रोकोली ज्यूस

ब्रोकोलीचा ज्यूस बनवण्यासाठी ब्रोकोली, गाजर, पालक आणि आले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे लागेल. आता त्यांच्यापासून रस काढावा. हा ज्यूस रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे आणि दिवसाची सुरुवात करण्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे.

ब्रोकोली ऑम्लेट

सकाळच्या नाष्ट्यासाठी अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये चिरलेली ब्रोकोली मिसळून ऑम्लेट बनवता येते. यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात जे तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देतात.

Edited by - अर्चना चव्हाण

Broccoli
Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com