3rd Shravani Somwar 2023 : आज 4 सप्टेंबर तिसरा श्रावणी सोमवार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शिवलिंगाला ही शिवमूठ वाहा

Shravani Somwar 2023 : आज म्हणजेच 4 सप्टेंबर 2023 हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे. महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते.
3rd Shravani Somwar 2023
3rd Shravani Somwar 2023Saam Tv
Published On

Shravani Somwar :

आज म्हणजेच 4 सप्टेंबर 2023 हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे. महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते. श्रावणतल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात.

श्रावणाच्या सोमवारी उपवास करून महादेवाची पूजा (Pooja) केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात. यावेळी श्रावणाचा तिसरा सोमवार अतिशय खास मानला जात आहे,कारण या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी शिवलिंगाला कोणती शिवमूठ वाहिली जाते जाणून घेऊया...

3rd Shravani Somwar 2023
Shravani Somwar 2023 : आज श्रावणातील दुसरा सोमवार, आर्थिक प्रगतीसाठी शंकराला अर्पण करा ही शिवामूठ

श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी या पद्धतीने पूजा करावी -

  • श्रावणाच्या तिसर्‍या सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करावी.

  • सकाळी शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

  • भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करा.

  • यानंतर भगवान शिवशंभूला चंदन, अक्षत, पांढरी फुले, बेलपत्र, भांगाची पाने, शमीची पाने, धतुरा, भस्म आणि फुलांच्या माळा अर्पण करा.

  • यानंतर भगवान शंकराला मध, फळे, मिठाई, साखर (Sugar), धूप-दीप अर्पण करा.

  • शिव चालिसा आणि सोमवार व्रत कथा पाठ करा.

  • शेवटी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून भोलेनाथाची आरती करावी.

आज कोणती शिवमूठ वाहिली जाते -

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तुम्हाला मूग वाहिले पाहिजे. या दिवशी तुम्ही मूग शिवलिंगाला वाहू शकता. यामुळे देव प्रसन्न होईल आणि तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल.

3rd Shravani Somwar 2023
Adhik Maas Third Shravani Somvar 2023: अधिक मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी शुभ संयोग! या राशींचे उजळेल भाग्य, होईल धनलाभ

आर्थिक लाभाचे उपाय -

जर तुम्ही आर्थिक दृष्टिने त्रस्त असाल तर श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दुधात गंगाजल मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. हा उपाय केल्याने उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतात.

यशासाठी उपाय -

जर खूप मेहनत करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये (Career) हवे तसे यश मिळत नसेल, तर त्यासाठी श्रावणाच्या सोमवारी भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करावा. हा उपाय केल्यास लवकर यश मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com