शेअर बाजारात हाहा:कार; सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

४ दिवसाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजाराची सुरुवात घसरण झाली
Share Market Latest Updates | Sensex News, Sensex Latest Updates, Nifty Today
Share Market Latest Updates | Sensex News, Sensex Latest Updates, Nifty TodaySaam Tv
Published On

वृत्तसंस्था: ४ दिवसाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजाराची सुरुवात घसरण झाली आहे. मुंबई (Mumbai) शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीमध्ये ३०० अंकाची घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारामध्ये झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Share Market) दिसून आला आहे. रशिया (Russia)- युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध, आंतरराष्ट्रीय (International) बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम मार्केट बाजारावर झाला असल्याचे सांगितले जात आहे. (Share Market Latest Updates)

हे देखील पहा-

सिंगापूर (Singapore) एक्सचेंजवरील (SGX निफ्टी) निफ्टी फ्युचर्सवर व्यवहाराने देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात 'गॅप डाऊन'ने होण्याचे संकेत दिसत होते. सेन्सेक्स (Sensex) ५७,३१० अंकावर आणि निफ्टी १७,१८३ अंकावर खुला झाला आहे. निफ्टीमधील ५० पैकी ७ शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. तर, ४३ शेअरर्समध्ये (sharers) घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी ४ शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. २६ शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये १.७३ टक्क्यांची घसरण दिसत असून ३६,८१३ अंकावर व्यवहार करत आहे.

Share Market Latest Updates | Sensex News, Sensex Latest Updates, Nifty Today
हुबळीत दिल्लीसारखा हिंसाचार; पोलीस ठाण्यावर हल्ला, 12 जखमी; 40 जणांना अटक

एफएमसीजी, मेटल्स क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा सारख्या घसरण दिसून आली आहे. एनटीपीसीमध्ये १.५९ टक्के, टाटा स्टीलमध्ये ०.८७ टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ०.४९ टक्के, पॉवरग्रीडमध्ये ०.१७ टक्के, एचयूएलमध्ये ०.१२ टक्के, नेस्लेमध्ये ०.०५ टक्के. आयटीसीमध्ये ०.०४ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com