>> नवनीत तापडिया
Depression Symptoms in Women: आजच्या युगात मोबाईल सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढलं आहे. विशेषता महिलांमध्ये फोटो काढताना फिल्टरचा वापर सर्रास केला जातो. मात्र त्यामुळे नैराश्य येत असल्याचं धक्कादायक वास्तव्य मानस उपचारातज्ञांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आपल्या कामावर आणि दैनंदिन जीवनावर सतत त्याचा परिणाम दिसून येतो.
सोशल मीडियावर महिलांमध्ये फोटो (सेल्फी) काढून अपलोड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र त्यांची हीच सवय त्यांना नैराश्यात ढकलत असल्याचा एका अहवालातून उघड झाला आहे. अनेक वेळा सेल्फी काढल्यावर त्याची तुलना इतरांसोबत केली जाते. आपल्यापेक्षा इतर कोणाचं चांगला फोटो असला तर, आपण तसे का नाही? असा विचार महिलांच्या डोक्यात गोंगावू लागतो. त्यामुळे लक्ष विचलित होऊन मानसिक ताण वाढल्याचा अनुभव महिलांना येत असतो.
मोबाईल मधील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत, त्यात वापरण्यात आलेल्या कॅमेऱ्याचे वेगवेगळे फीचर्स तरुणांना आकर्षित करतात. मोबाईल कॅमेऱ्यात काढलेला फोटो, त्याला वेगवेगळे फिल्टर लावून बदलणे शक्य होतं. त्यामुळे आपण कसे चांगले दिसू याकडे आजच्या तरुणाईच लक्ष असतं. (Latest Marathi News)
विशेषतः मुली फोटो काढल्यावर त्याला वेगवेगळे फिल्टर वापरून, आपण किती सुंदर आहोत हे भसवण्याचा प्रयत्न करतात. मात्र असं असताना आपण प्रत्यक्षात असे का नाही? असा विचार त्यांच्या मनात फिरत असतो. त्यात आपल्या सोबतच असलेल्या परिचित व्यक्तीचे फोटो पाहून त्याबाबत देखील मोठ्या प्रमाणात तुलना केली जाते.
आधीच महिलांमध्ये कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींचा ताण असतो, त्यात मोबाईल फोटो आणि त्यासाठी वापरण्यात लावलेले फिल्टर, यामुळे ताण येण्यास भर पडते. मुलगी असली तर ती सुंदरच असते, अशी संकल्पना घातक असल्याचं मत देखील मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
सध्या प्रत्येक व्यक्तीचा अर्धा वेळ सोशल मीडियावर जातोय. त्यात समाज माध्यम दिवसेंदिवस आपल्या मनावर ताबा मिळवत असल्याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते. विशेषतः महिलांमध्ये या बाबींचा सखोल परिणाम होत असल्याचं काही अहवालातून स्पष्ट झाला आहे. त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर सोशल मीडिया सांभाळून हाताळायला हवा.
समाज माध्यम ही माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी उपयुक्त असतात. इतकच नाही तर संवाद साधण्यासाठी देखील हे उत्तम साधन आहे. मात्र त्यात कशा पद्धतीने आपण आपलं मानसिक आरोग्य सांभाळू शकतो हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे सोशल मीडिया जर काही ठराविक बाबींसाठी वापरला गेला, तर आपल्यासाठी चांगलं असेल हे मात्र नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.