
Big Bazaar Name Change: प्रसिद्ध अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) गेल्या आठवड्यात बिग बाजारचा (Big Bazaar) ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीने फ्युचर ग्रुपच्या (Future Group) या सर्वात मोठ्या ब्रँडचे नाव बदलण्याच्या तयारीत आहे.
Big Bazaar चे नाव बदलणार;
रिलायन्स रिटेल (Reliance Retail) आता त्या सर्व ठिकाणी नवीन रिटेल स्टोअर्स उघडणार आहे जिथे पूर्वी बिग बाजार होते. या नवीन स्टोअरचे नाव स्मार्ट बाजार (Smart Bazaar) असे असणार आहे. रिलायन्स रिटेल ही मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल क्षेत्रातील कंपनी आहे. हे आधीच रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स डिजिटल सारखी रिटेल स्टोअर्स चालवते.
950 ठिकाणी उघडणार Smart Bazaar;
रिलायन्स रिटेल 950 ठिकाणी स्वतःचे स्टोअर उघडणार आहे. ही सर्व ठिकाणे कंपनीने फ्युचर ग्रुपकडून ताब्यात घेतली आहेत. एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, कंपनी या महिन्यात सुमारे 100 ठिकाणी 'स्मार्ट बाजार' नावाने स्टोअर उघडणार आहे. मात्र, या संदर्भात रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
हे देखील पहा-
अशाप्रकारे बिग बाजारचे अधिग्रहण;
फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यात 24,713 कोटी रुपयांची डील होऊन एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. परंतु अॅमेझॉनच्या काही खटल्यांमुळे हा करार पूर्ण झालेला नाही. गेल्या आठवड्यापासून, रिलायन्सने याबद्दचा आपला निर्णय घेत फ्यूचर ग्रुपचे बिग बाजारचे स्टोअर ताब्यात घेतले आहे. रिलायन्सने प्रथम बिग बाजार स्टोअर्स त्यांच्या नावावर भाडेतत्त्वावर घेतले, परंतु फ्युचरला ऑपरेट करण्यास परवानगी दिली होती. आता रिलायन्स, स्टोअर्सचा ताबा घेत आहे कारण फ्युचर ग्रुप त्यांचे भाडे देऊ शकत नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.