
Ratan Tata Birthday: आपल्या असामान्य कर्तुत्वाने आणि इच्छाशक्तीने जगभरातील उद्योजक विश्वात प्रेरणास्त्रोत्र ठरणाऱ्या रतन टाटांचा आज वाढदिवस. जगभरात त्यांची आदर्श, प्रेरणादायी उद्योजक अशी खास ओळख आहे.
उद्योग जगतात यशाचे शिखर गाठणारे रतन टाटांनी सामाजिक क्षेत्रातही त्यांची खास ओळख निर्माण केली आहे. तरुणांना प्रेरणा देणाऱ्या रतन टाटांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या व्यक्तीमत्वाची खास ओळख करुन देतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहूया अशाच माहित नसलेल्या गोष्टी. (Ratan Tata)
दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव सुनी टाटा आणि वडिलांचे नाव नवल टाटा होते. रतन टाटांनी कॉर्नेल युनिवर्सिटीमधून आर्किटेक्चर आणि स्टक्चरल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली होती. आपल्या कौटुंबिक व्यवसायात त्यांनी थेट मोठ्या पदावर काम न करता एक कर्मचारी म्हणून सुरूवात केली होती.
टाटा उद्योग समूहाचे जागतिकीकरण- १९९१मध्ये रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाची धुरा आपल्या हातात घेतली. हा तो काळ होता जेव्हा जागतिकीकरण भारतासाठी नवीन होते. पण टाटा समूहाला जागतिक पातळीवर नेण्यात रतन टाटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टाटा कंपनीने जागतिकीकरणात पाऊल ठेवत २००० मध्ये टेटली कंपनीला टेकओव्हर करत टाटा कंपनीने जागतिकीकरणात पाऊल ठेवले.
त्यांनी फक्त ९ वर्षात तब्बल ३६ कंपन्या टेकओव्हर केल्या. टेटलीनंतर त्यांनी अनेक लहानमोठ्या कंपन्या आपल्या ताब्यात घेत कंपनीचा विस्तार केला. ज्यामध्ये टाटा स्टिलकडून डच स्टिल, तसेच टाटा मोटर्स मार्फत जग्वार आणि लॅंन्ड रोवर कंपन्या ताब्यात घेतल्या.
पहिली मेड इन इंडिया कारः टाटा कंपनीने टाटा इंडिकाही पहिली मेड इन इंडिया कार तयार केली. १९९८मध्ये भारताच्या या पहिल्या कारला ऑटो एक्सपो तसेच जेनेवो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात दाखवण्यात आले होते. टाटा इंडिका ही पेट्रोल तसेच डिझेलवर चालणारी कार होती. त्यानंतर टाटांनी नॅनोची निर्मिती करत जगातील सर्वात स्वस्त कार बनवण्याचा विक्रमही केला.
दानशूर टाटा: उद्योग जगतासोबतच रतन टाटा त्यांच्या दानशूर वृत्तीसाठीही ओळखले जातात. १९१९ मध्ये ८० लाख रुपयांच्या ठेवीसोबत सर रतन टाटा ट्रस्टची स्थापना करण्यात आली. टाटा ट्रस्टही सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित चॅरिटी ट्रस्ट आहे. या मार्फत त्यांच्या कंपनीच्या कमाईतून ६६% हिस्सा हा देशात शिक्षण, कला, आरोग्य इत्यांदासाठी मदत म्हणून दिला जातो. (Ratan Tata Birthday)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.