Weight Loss Tips: ना क्रॅश डाएट, ना जिम..! फक्त १५ दिवसांत ५ किलो वजन कमी करा, ‘या’ टिप्स फॉलो करा

Quick Weight Loss: वजन कमी करणे खूप लोकांसाठी आव्हान असते, पण योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास १५ दिवसांत ५ किलो वजन कमी करणे शक्य आहे. क्रॅश डाएट किंवा जिम न करता साध्या टिप्सने तुम्ही वजन कमी करू शकता.
Lose Weight Fast with Simple and Effective Tips
साध्या आणि प्रभावी टिप्सने वजन कमी कराGoogle
Published On

वजन कमी करणे प्रत्येकासाठी खूप मोठे आव्हान असते. वजनवाढीच्या समस्येने अनेक लोक ग्रासलेले असतात आणि वजन कमी करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात. १५ दिवसांत ५ किलो वजन कमी करणे हे कठीण असले तरी योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल केल्यास तो शक्य आहे. क्रॅश डाएट किंवा जिममध्ये न जाता तुम्ही या टिप्स फॉलो करून वजन कमी करू शकता:

१. आहारावर नियंत्रण ठेवा

साखर आणि मैद्याचे पदार्थ टाळा – बिस्किटे, केक, जंक फूड, आणि कोल्ड्रिंक्स कटाक्षाने बंद करा.

फायबरयुक्त आहार घ्या – संपूर्ण धान्य, फळे, भाज्या यांचा समावेश करा, ज्यामुळे पचन सुधारेल.

प्रथिनयुक्त पदार्थ खा – अंडी, डाळी, पनीर, दही यांचा आहारात समावेश करा.

तळलेले आणि जड पदार्थ टाळा – तेलकट पदार्थ, मसालेदार जेवण आणि फास्टफूडपासून दूर राहा.

Lose Weight Fast with Simple and Effective Tips
Weight Loss: ऑफिसमध्ये बसून पोटाची चरबी वाढली आहे? बेली फॅट कमी करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

२. पुरेसे पाणी प्या

दिवसाला किमान ३-४ लिटर पाणी प्या.

सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून घ्या.

जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी आणि नंतर पाणी प्या, पण जेवताना टाळा.

३. रोज हलका व्यायाम करा

सकाळी आणि संध्याकाळी ३०-४५ मिनिटे चालण्याचा किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करा.

योगासनं आणि स्ट्रेचिंग करा, ज्यामुळे शरीर लवचिक राहील.

दिवसातून १०-१५ मिनिटे स्क्वॅट्स, पुशअप्स किंवा हलका वर्कआउट करा.

Lose Weight Fast with Simple and Effective Tips
Weight Gain: लठ्ठपणा नियंत्रणाबाहेर जातोय? कारणे आणि त्यावरील उपाय शोधा!

४. झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट

दररोज ७-८ तास शांत झोप घ्या.

तणाव टाळण्यासाठी ध्यान (मेडिटेशन) आणि श्वसनाचे व्यायाम करा.

५. घरगुती उपाय ट्राय करा

मेथीचे पाणी, जिरे पाणी किंवा दालचिनी चहा घ्या, हे वजन कमी करण्यात मदत करतात.

आल्याचा काढा किंवा लिंबूपाणी सकाळी उपाशीपोटी प्या.

Lose Weight Fast with Simple and Effective Tips
Right Weight For Age : वयोमानानुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? कसं मोजाल वय आणि वजनाचं गणित, पाहा चार्ट

६. आहार वेळेवर घ्या

रात्री लवकर जेवा आणि झोपण्याच्या किमान २-३ तास आधी जेवण आटोपून टाका.

दिवसभरात लहान लहान भागात खा, पण जास्त प्रमाणात नका खाऊ.

ही सवय लावल्यास तुमचे वजन नैसर्गिकरित्या कमी होईल आणि शरीर तंदुरुस्त राहील. त्यासाठी वरिल टिप्स नक्की फॉलो करा; आणि वजन कमी करा.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com