Age Gap Problems: पती-पत्नीच्या वयात मोठा फरक असल्यास उद्भवू शकतात 'या' समस्या!

आजही काही जोडप्यांच्या वयामध्ये खूप अंतर असते, पण तज्ज्ञांच्या आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयातील फरकही खूप महत्त्वाचा ठरतो.
Age Gap Couple
Age Gap CoupleSaam Tv

आजपर्यंत आपण असं ऐकत आलो आहोत, लग्नासाठी वयाची नव्हे तर परस्परातील समंजसपणा, प्रेम आणि विश्वास हे नात्यात जास्त आवश्यक आहे, आणि हेच मत आजच्या 'काही' तरुण पिढीचे देखील आहे. पण तज्ज्ञांच्या आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या वयातील फरकही खूप महत्त्वाचा ठरतो. जर पती-पत्नीच्या वयात जास्त फरक असेल तर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पूर्वीच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर, लग्नासाठी वयाच्या फरकामुळे जोडप्यांना त्यांच्या आयुष्यात काही विशिष्ट समस्यांना सामोरे जावे लागत नसेल असे आज आत्ता आपण म्हणू शकत नाही. तेव्हाच्या आणि आजच्या काळात खूप फरक निर्माण झाला आहे. वेळ वेगाने पुढे जात आहे. जग प्रत्येक क्षणाला बदलत आहे. लोकांची विचारसरणी आणि राहणीमानही आज बदलले आहे.

पती-पत्नीच्या वयातील फरक जास्त असेल तर त्या जोडप्यांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे सामान्यतः म्हटले जाते. अशा परिस्थितीत, जर विवाहित जोडप्यांमध्ये वयात मोठा फरक असेल तर त्यांच्यामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात याबद्दल जाणून घेऊयात.

समाजाकडून नेहमी जज केले जाणे;

आपल्या बॉलीवूडमध्येही अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांच्या वयात खूप फरक आहे आणि त्यामुळे अनेकदा त्यांना जज केले जाते. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनाही जीवनात या समस्येचा सामना करावा लागतो. आपण असे अनेकदा पाहतो की, एखाद्या जोडप्याच्या वयात मोठा फरक असेल तर समाजात अनेकदा त्याना जज केले जाते. काही लोक त्या कपल्सवर टीका करतात, तर काही लोक त्यांच्या वयाबद्दलच्या फरकामुळे मागे अनेक गोष्टी बोलतात.

पार्टनरला दोषी ठरवणे;

वयात जास्त फरक असलेल्या कप्लसला लग्नानंतर ही सर्वात मोठी समस्या आहे. लग्नानंतर त्यांच्या आजूबाजूचे लोक गरज नसताना त्यांची मस्करी करतील आणि त्यांना वयातील फरक दाखवून देतात. अश्या परिस्थितीत होऊ शकत की, कपल्समध्येच भांडण, रुसवा निर्माण होऊ शकतो. परिणामी जोडपे याबद्दल एकमेकांना दोषी ठरवू लागत.

विचारसरणी आणि मानसिकतेमधला फरक;

जर मुलगा-मुलगी लहानपणापासून पूर्णतः वेगळ्या वातावरणात वाढले असतील तर ही साहजिक गोष्ट आहे की, दोघांची विचारसरणी वेगळी असणार. याच कारण आहे की, दोघांची कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करण्याची पद्धत वेगळी असते. विचार वेगवेगळे असल्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दलचे मत पण वेगळे असू शकते. त्यामुळे जर एखाद्या मुद्द्यावर मत जुळत नसेल तर दोघांमध्ये भांडण तर होणारच!

फॅमिली प्लॅनिंगमध्ये निर्णय घेण्यास दुमतं;

वयात मोठा फरक असलेल्या जोडप्यांना मुले होण्याची समस्या उदभवू शकते. कदाचित असं होऊ शकते की, जोडप्यांपैकी एकाला मूल हवे असेल तर दुसऱ्याला नाही. वाढत्या वयामुळे, असे होऊ शकते की वयाने मोठ्या असणाऱ्या जोडीदाराची मुले होण्याची वेळ संपत आहे, कारण असे असते की, वेळोवेळी व्यक्तीची प्रजनन क्षमता कमी होत असते. आता अशा परिस्थितीत जर समोरचा जोडीदार मुलासाठी तयार नसेल, तर? त्यामुळे अशा परिस्थितीत समस्या उद्भवू शकतात.

लैंगिक जीवनातील समस्या:

जेव्हा लैंगिक सुसंगततेचा (Sex Compatibility) विचार केला जातो तेव्हा, वयाच्या मोठ्या अंतरामुळे या समस्येचा सामना केला जाऊ शकतो. याचे कारण म्हणजे वयाने मोठा असलेल्या जोडीदाराला कालांतराने लैंगिक इच्छा किंवा कामवासने होत असते परंतु यामुळे जर, ईच्छा नसेल तर तरुण जोडीदाराला याचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत शारीरिक समाधान न मिळाल्याने नात्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com