कोरोनावर मात केलेल्या अनेकांमध्ये सध्या विविध प्रकारचे आजार उद्भवल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र नकारात्मक आणि नैराश्याचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळेच या नैराश्यावर मात करुन शारीरिक व मानसिक स्वास्थ जपणं अत्यंत गरजेचं आहे. विशेष म्हणजे तन आणि मन यांचं आरोग्य जपण्यासाठी ‘सकाळ’ व ‘योग ऊर्जा’ यांनी एकत्रितपणे 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम'चं आयोजन केलं आहे. मात्र, हा कोर्स कोणी करावा? त्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
कोविडवर मात केलेल्या अनेकांमध्ये सध्या श्वसनाशी संबंधित तक्रारी जाणवत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच श्वसनाशी संबंधित निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी हा कोर्स अत्यंत गरजेचं आहे.
कोविडवर मात केल्यानंतर 'हा' त्रास होतोय?
कोविडवर मात केल्यानंतर श्वास घेताना अडथळा निर्माण होणे, धाप लागणे, अँग्झायटी, डिप्रेशन, थकवा जाणवणे, अशक्तपणा. या समस्या जाणवत असतील तर अशा व्यक्तींनी 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' मध्ये नक्कीच सहभागी झालं पाहिजे.
हे देखील पहा -
कोविड झाला नसेल तरीदेखील करू शकता हा कोर्स
जर तुम्हाला कोविड झाला नसेल किंवा कोविड होऊ नये अशी इच्छा असेल तर हा कोर्स नक्कीच केला पाहिजे. या कोर्समध्ये सहभागी झाल्यामुळे तुमचा शारीरिक व मानसिक ताण नक्कीच कमी होईल. तसंच या कोर्समुळे रोगप्रतिकार शक्ती, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर शरीरातील प्रत्येक भागात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. मानसिक ताणदेखील कमी होतो.
येत्या १२ जुलैपासून 'पोस्ट-कोविड रिकव्हरी प्रोग्रॅम' सुरु होणार असून तो १२ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. हा कोर्स ऑनलाइन स्वरुपात असल्यामुळे जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील व्यक्ती यात सहभागी होऊ शकतात. या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी यावर क्लिक करा (https://www.yogaurja.com/post-covid-recovery-program.html) किंवा क्यूआर कोड स्कॅन करा.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.