Corona News: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक

कोरोना साथीच्या सुरुवातीपासून वृद्धांना जास्त धोका असल्याचे मानले जात आहे. वयोवृद्ध नागरिक कोणत्याही संसर्गास सर्वांत जास्त असुरक्षित असतात. जीवाणू, बुरशीजन्य किंवा विषाणूजन्य संक्रमणाच्या विळख्यात ते येतात
Corona News: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक
Corona News: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक- Saam Tv
Published On

मुंबई : कोरोना साथीच्या सुरुवातीपासून वृद्धांना जास्त धोका असल्याचे मानले जात आहे. वयोवृद्ध नागरिक कोणत्याही संसर्गास सर्वांत जास्त असुरक्षित असतात. जीवाणू, बुरशीजन्य किंवा विषाणूजन्य संक्रमणाच्या विळख्यात ते येतात. अशा परिस्थितीत कोरोनाची (Corona) लागण झालेल्या वृद्धांमध्ये कोरोनापश्‍चात समस्या गंभीर बनल्या आहेत. (Post Covid care of Senior Citizens is necessary)

त्यांच्यावर उपचार करणे हे डॉक्टरांसाठी (Doctor) मोठे आव्हान ठरले आहे. कोरोनानंतरच्या काळात वृद्धांवर लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. वृद्धांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होणे, शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची क्षमता कमी होणे आदी कारणांमुळे संसर्ग लवकर होण्याचा धोका असतो. जे वृद्ध रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, त्यांची तीन-चार आठवडे काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

Corona News: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक
अमेरिकेत वन्य प्राण्यांपर्यंत पोहोचला कोरोना, हरणांना ओमिक्रॉनची लागण

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर इतर संसर्ग टाळण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. या काळात शरीर खूप कमकुवत होते. पुन्हा संसर्ग होण्याचा धोका असतो. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणि गंभीर उपचारांमध्ये काळजी, उपचारांनंतरही कोरोनानंतरच्या खोलीत स्वच्छता आणि साफसफाई ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही संसर्ग पुन्हा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये.

कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, की वाढत्या वयाबरोबर वृद्धांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे कोणताही संसर्ग लगेच प्रबळ होतो. कोरोनामधून बरे झालेल्या वृद्धांमध्ये श्वसनात अडथळा, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आदी आरोग्यविषयक समस्या अधिक दिसल्या आहेत. अशा रुग्णांवर वेळोवेळी लक्ष ठेवावे लागते. कोणत्याही रोगाची नवीन लक्षणे दिसल्यास त्याची तपासणी करून त्यावर त्वरित उपचार घ्यायला हवेत.

विविध त्रासांची शक्यता
इंटर्नल मेडिसिन विभागाचे डॉ. हनी सावला म्हणाले की, अनेकदा वृद्ध लोकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कोरोनाला हरवलेले वयोवृद्ध शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झालेले आहेत. कोरोनानंतरच्या काळात फुप्फुसात संसर्ग, लघवीचा संसर्ग, कमी रक्तदाब अशा तक्रारी वृद्धांमध्ये अधिक आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांना ‘आयसीयू’मध्ये दाखल करणे कठीण झाले आहे. कोरोनानंतर रक्त घट्ट झाल्यामुळे फुप्फुस, हृदयाच्या धमन्या आणि मेंदूच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचेही दिसले आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांना विचारपूर्वक रक्त पातळ करणारी औषधे द्यावी लागतात. ही औषधे अतिप्रमाणात घेतल्यास मेंदूमध्ये रक्तस्राव होणे, नाकातून रक्त येणे इत्यादींचा धोका असतो. कधी कधी अनेक वयोवृद्धांना कोरोनाचा संसर्ग होतो, तरीही त्यांना कळत नाही. कोरोनानंतर त्यांना डिहायड्रेशन, श्वसनाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com