आपण निरोगी आरोग्यासाठी विविध पदार्थांचे सेवन करतो. त्या पदार्थांमध्ये आपण फळांचाही समावेश करतो. फळे आपल्या शरीराबरोबर आपल्या त्वचेसाठी फळे फार महत्वाची असतात. आपण आपल्या त्वचेच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना फार गंभीर असतो. मात्र आता विविध फळांचा वापर त्वचेवर न खाबरता करु शकता. फळांमध्ये आपल्या त्वचेसाठी 'डाळींब' फार फायदेशीर आहे. तसेच डाळींब आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. डाळींबाचे नियमीत सेवन केल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. डाळींबामुळे स्मरणशक्तीही सुधारते.
मऊ त्वचेसाठी डाळींबाचा वापर
त्वचेसाठी योग्य स्किनकेअर गरजेचे आहे. त्यात आपल्या चेहऱ्याची त्वचा फार नाजूक असते. आपण त्यावर दररोज केमीकल युक्त प्रोडक्ट्सचा वापर केला तर, आपल्या चेहरा कमी वयातच वृध लोकांसारखा दिसायला लागतो. सोबतच आपल्या चेहऱ्यावर डाग यायला सुरुवात होवू शकते. त्यामुळे आपण केमीकलचे प्रोडक्ट्स न वापरता घरगुती रेमीडींचा वापर केला पाहीजे. त्यात डाळींब फार महत्वाचे असते. डाळींबाच्या वापर चेहऱ्यावर केल्याने तुम्हाला सगळ्यात उत्तम आणि मऊसूत चेहरा मिळू शकतो.
डाळींबाचा फेस मास्क
चेहऱ्याला फेस मास्क लावल्याने आपला चेहरा चमकदार आणि उजळ दिसायला मदत होते. चेहऱ्यावनर साचलेली धूळ माती फेस मास्कने निघून जाते. त्यात तुम्हीडाळींबाचे फेस मास्क लावले तर ते तुम्हाला चेहऱ्यात सगळ्यात जास्त फरक जाणवेल. डाळींबाचे हे रसाळ दाणे असलेले फळ तुम्हाला त्वचेच्या होणाऱ्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉल यांसारखे अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरचा तणाव आणि त्वचेवर होणारी जळजळ कमी होते.
चेहऱ्याचे वृद्धत्व टाळण्यासाठी डाळींबाचा उपयोग
डाळिंबात बायोएक्टिव्ह घटक, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनॉल यांसारखे घटक असतात. डाळिंबांचा वापर चेहऱ्यावर केल्याने सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. त्वचेवर पिंपल्स येणं कमी होते. त्याचसोबत चेहरा चमकदार आणि तरुण दिसायला मदत होते.
डाळींबाचे महत्वाचे फायदे
तुमच्या रोजच्या आहारात डाळींबाचा समावेश असला पाहिजे. डाळींबाने पचनसंस्था सुधारते. डाळींबामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग कमी व्हायला मदत होते. डाळींबात फायबर, साखर आणि पेक्टिनने भरलेले असते. त्याने चेहऱ्यावरचा काळपटपणा दूर राहतो. डाळींबाचे फेस माक्स तुमचा रंग उजळ होतो. तसेच तुम्ही सुंदर दिसायला मदत होते.
तुम्ही वेगवेगळ्या पद्धतींनी घरच्या घरी फेस मास्क तयार करु शकता. त्याशिवाय तुम्ही मार्केट मधून फेस मास्क विकत आणू शकता. घरच्या घरी फेस मास्क वापरताना तुम्ही दोन चमचे डाळिंबाच्या रसात एक चमचा मध मिसळा.डाळिंबाचा रस आणि मध मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
Written By : Sakshi Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.