Recharge Plans For IPL : 31 मार्च रोजी IPL चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाईल. यावेळी आयपीएल जिओ सिनेमा अॅपमध्ये प्रसारित केले जाईल जे तुम्ही स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप इत्यादीवरून पाहू शकता.
जर तुम्ही आयपीएलपूर्वी स्वत:साठी सर्वोत्तम रिचार्ज प्लान शोधत असाल, ज्यामध्ये तुम्ही दररोज इंटरनेट वापरू शकता, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही सर्वोत्तम रिचार्ज योजना सांगणार आहोत.
आम्ही तुम्हाला तीन प्रमुख टेलिकॉम ऑपरेटर्स, Vodafone, Jio आणि Airtel चे प्लान सांगणार आहोत, ज्यांची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे.
रिलायन्स Jioचा 269 रुपयांचा प्लान -
रिलायन्स जिओचा (Jio) हा सर्वात स्वस्त मासिक प्रीपेड प्लॅन आहे ज्यामध्ये दैनंदिन डेटाची मर्यादा नाही. हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो ज्यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस, अमर्यादित कॉल आणि 25GB डेटाचा लाभ मिळतो.
Airtelचा 296 रुपयांचा प्लान -
एअरटेलच्या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये कंपनी तुम्हाला 30 दिवसांसाठी दररोज 100 एसएमएस, अमर्यादित कॉल आणि 25GB डेटा देते. जर तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्क आले असेल आणि तुम्ही 5G स्मार्टफोन (Smartphone) वापरत असाल, तर तुम्ही Airtel ने दिलेल्या 'Free Unlimited 5G' ऑफरचा लाभ घेऊन कितीही डेटा वापरू शकता. एअरटेलने ही ऑफर अगदी Jio प्रमाणेच सुरू केली आहे, ज्यामध्ये कंपनी लोकांना मोफत 5G डेटा वापरण्याची संधी देत आहे.
Vodafone-Idea चा 296 रुपयांचा प्लान -
Vodafone-idea आपल्या प्रीपेड ग्राहकांना 296 रुपयांमध्ये 30 दिवसांसाठी 100 एसएमएस, अमर्यादित कॉल आणि 25GB डेटा प्रतिदिन देते. जर काही कारणास्तव हे डेटा पॅक लवकर संपले, तर तुम्ही डेटा रोलओव्हर योजना देखील निवडू शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.