Pitru Paksha 2024 : पितृपक्ष सुरू असतानाच लेकीचा जन्म झालाय? यापेक्षा सुंदर नावांची लिस्ट शोधूनही सापडणार नाही

Daughter Name List : पितृपक्षात तुमच्या मुलीचा जन्म झाला आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काही नवीन नावे शोधत असाल तर ही नावे फार खास आहेत.
Daughter Name List
Pitru Paksha 2024 Saam TV
Published On

सध्या पितृपक्ष सुरू आहे. १७ ऑक्टोंबरपासून पितृपक्षाला सुरूवात झाली असून २ ऑक्टोंबरपर्यंत पितृपक्ष चालणार आहे. या दिवसांत आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी पुजा केली जाते. तसेच त्या व्यक्तीच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवून नैवेद्यात ठेवले जातात. या काळात जर तुमच्याघरी एखाद्या लहान मुलीचा किंवा मुलाचा जन्म झाला तर त्यांच्या रुपात तुमच्याघरी पूर्वज आले आहेत असं म्हटलं जातं.

Daughter Name List
Gold-Silver News : पितृ पक्षाला सुरुवात होताच सोनं झालं स्वस्त; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील भाव काय?

आता तुमच्या घरी देखील एखाद्या लहान मुलीने जन्म घेतला असेल तर घरात आनंद आणि हर्ष उत्साहाचं वातावरण पसरलेलं असतं. या चिमुकलीसाठी आता तुम्ही सुद्धा काही नवीन आणि सुंदर नावांची लिस्ट शोधत असाल तर आम्ही देखील काही सुंदर नावांची यादी शोधली आहे. मुलींची ही नावे तुम्हालाही फार आवडतील. शिवाय यातील एक नाव तुम्ही तुमच्या चिमुकल्या लेकीसाठी निवडू शकता.

अन्विता

अ अक्षरापासून सुरू होणारं हे नाव अगदी सुंदर आहे. अन्विता म्हणजे अशी व्यक्ती सर्वांना मार्गदर्शन करते आणि योग्य वाट चालण्यासाठी मार्ग दाखवते. पितृपक्षात आपण पूर्वजांचा आशीर्वाद घेत असतो. त्यामुळे या काळात जन्मलेली मुलं फार तल्लख बुद्धीची असतात.

कृतिका

कृतिका हे नाव प्रत्येक व्यक्तीला आवडतं. तुम्हाला सुद्धा कृतिका नाव फार आवडत असेल. कृतिका नावाचा अर्थही अतिशय सुंदर आहे. कृतिका म्हणजे सर्व कार्य पार पाडणारी व्यक्ती. अशी व्यक्ती जी आपल्या आयुष्यात एकही कार्य अर्धवट किंवा अपूर्ण ठेवत नाही. तुम्ही तुमच्या लेकीचं नाव कृतिका ठेवाल तर तिचं आयुष्य आनंदाने बहरेल. तसेच ती भविष्यात ऊर्जा, सुदृढ आणि बुद्धीमान स्त्री म्हणून समाजात वावरेल.

स्मृती

स्मृती हे नाव सध्या ट्रेंडींगमध्ये आहे. प्रत्येक व्यक्तीला आपली स्मृती चांगली असावी असं वाटतं. त्यावरून तुम्ही मुलीचं नाव स्मृती सुद्धा ठेवू शकता. कारण ती तुमच्या पूर्वजांची आठवण घेऊन आलेली असते. त्यामुळे पितृपक्षातील हे नाव मुलींसाठी फार छान आहे.

आस्था

आस्था या नावाचा मराठी अर्थ विश्वास आहे. आपल्या पूर्वजांना आपल्या विषयी आस्था असते. त्यांच्या मनात कायम आपल्यासाठी चांगले विचार असतात. आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गांवर चालू असा विश्वासही त्यांच्या मनात असतो. त्यामुळे आस्था नावाच्या मुली विश्वासाचं प्रतिक मानल्या जातात.

Daughter Name List
Pitru Paksha 2024: पितृपक्षातील नैवेद्यासाठी खास काकडी रायता; वाचा परफेक्ट रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com