प्रतिक्षा संपली; OLA Electric Scooter 15 ऑगस्टला लाँच होणार

बहूचर्चित OLA Electric Scooter 15 ऑगस्टला लाँच होणार असल्याची माहिती ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.
प्रतिक्षा संपली; OLA Electric Scooter 15 ऑगस्टला लाँच होणार
प्रतिक्षा संपली; OLA Electric Scooter 15 ऑगस्टला लाँच होणार Saam Tv News
Published On

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित अशी ओला कंपनीची इलेक्ट्रीक स्कुटर (OLA Electric Scooter) येत्या १५ ऑगस्टला (15 august independent day) लाँच होणार असल्याची माहिती ओला कंपनाचे सीईओ भाविश अग्रवाल (OLA CEO Bhavish Agrawal) यांनी ट्विटरद्वारे (twitter) दिली आहे. (OLA Electric Scooter will launch on 15th August)

१५ ऑगस्टला होणाऱ्या लाँचिंग इव्हेंटमध्येच या स्कुटरची अधिकृत किंमत आणि स्पेसिफिकेशन्स यांची माहिती मिळणार आहे. सध्या या स्कुटरच्या किंमतीचे केवळ अंदाज लावले जातायत. त्यानुसार या स्कुटरची किंमत एक लाखाच्या आसपास असू शकते. सोबतच या स्कुटरचे S, S1 आणि S1 pro असे एकुण तीन मॉडेल लाँच होणार आहेत.

हे देखील पहा -

सध्या लाँचिंगच्या अगोदरच या स्कुटरची बुकिंग कंपनीने चालू केली आहे. केवळ ४९९ रुपये भरुन ही स्कुटर ओलाच्या अधिकृत वेबसाईटवरुन ऑनलाईन बुक करु शकता. तसेच हे ४९९ रुपये रिफंडेबल असणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या स्कुटरला मोठा प्रतिसाद मिळत असून केवळ २४ तासांतच एक लाख लोकांनी ही स्कुटर बुक केली आहे. या स्कुटरची खासियत म्हणजे केवळ १८ मिनिटं चार्ज केल्यानंतर ही स्कुटर ४५ किलोमीटर्स धावेल.

प्रतिक्षा संपली; OLA Electric Scooter 15 ऑगस्टला लाँच होणार
बायकोचा बर्थ डे विसरणे नवऱ्याला पडले महागात...

या इलेक्ट्रीक स्कुटरच्या फीचर्सबाबत बोलायचं झालं तर, या स्कुटरमध्ये लिथियम आयन बॅटरी असेल ची रिमुव्हबेल असेल. शिवाय अॅनॉय व्हील्स, डिजिटल इंस्ट्रमेंट कन्सोल आणि क्लाऊड कनेक्टीव्हीटीसारखे फीचर्स असतील. ही स्कुटर सिंगल चार्जमध्ये १५० किमी धावू शकेल असा अंदाज आहे. मात्र अधिकृत माहिती मिळाल्यावरच या स्कुटरची किंमत आणि फीचर्स कळू शकेल.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com