Multiple Myeloma : मल्टिपल मायलोमा कशामुळे होतो? याची लक्षणे कोणती?

Multiple Myeloma Causes : मल्टिपल मायलोमा हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो अस्थिमज्जाच्या प्लाझ्मा पेशींमध्ये उद्भवतो, जेथे या असामान्य पेशींची वाढ होते आणि संपूर्ण शरीरात गुंतागुंत होऊ शकते.
Multiple Myeloma
Multiple MyelomaSaam Tv

Multiple Myeloma Symptoms :

मल्टिपल मायलोमा हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो अस्थिमज्जाच्या प्लाझ्मा पेशींमध्ये उद्भवतो, जेथे या असामान्य पेशींची वाढ होते आणि संपूर्ण शरीरात गुंतागुंत होऊ शकते. वेळीच निदान आणि उपचार न मिळाल्यास, ते प्रगत अवस्थेत पोहोचतात,ज्याला शेवटच्या टप्प्यातील मायलोमा म्हणतात.

याविषयीची माहिती दिलीये साताऱ्यातील , एमडी, डीएम, क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट, ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे डॉ.विनोद पाटील म्हणतात मल्टिपल मायलोमा हा ब्लड कॅन्सरचा (Cancer) आजार (Disease) आहे. याची लक्षणे कोणती? उपचार कसे कराल? जाणून घेऊया.

1. शेवटच्या टप्प्यातील मायलोमाची लक्षणे कोणती?

कर्करोगाच्या मायलोमा पेशी अस्थिमज्जामध्ये गुणाकार करतात ज्यामुळे सामान्य लाल रक्तपेशींच्या उत्पादनावर परिणाम होतो, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो.

प्लाझ्मा पेशींचे नुकसान झाल्यामुळे हाडांमध्ये वेदना जाणवतात. या पेशींमुळे हाडे कमकुवत होतात, हाडांमध्ये वेदना होतात. एखाद्याला फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते, ज्यामुळे वेदना वाढतात. पाठ (मणका), बरगड्या आणि नितंबांमधील हाडांमध्ये वेदना जाणवतात.

Multiple Myeloma
Diabetes Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी हे ५ पदार्थ खायलाच हवे, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

मूत्रपिंड निकामी होणे: प्लाझ्मा पेशी असामान्यपणे प्रथिने उत्सर्जित करतात, जी किडनीमध्ये आढळून येतात किंवा मूत्रपिंडाचे (Kidney) नुकसान करतात ज्यामुळे किडनी निकामी होते आणि एखाद्या व्यक्तीला डायलिसिसची आवश्यकता भासू शकते.

पायांचा अर्धांगवायू: जर मायलोमा ट्यूमर पाठीच्या कण्यावर दाब आणत असेल तर एखाद्याला अर्धांगवायूचा त्रास होऊ शकतो.

विविध संक्रमण: एखाद्याला गंभीर न्यूमोनिया किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) होण्याची शक्यता असते. याकरिता वेळीच निदान करणे गरजेचे आहे

Multiple Myeloma
Colon Cancer Causes : आतड्यांच्या कॅन्सरचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

मल्टीपल मायलोमा हा कर्करोग झाला असेल तर त्याचं निदान व्हायला वेळ लागतो. सुरुवातीच्या काही टेस्ट केल्यावर तो लगेच लक्षात येत नाही. परंतु, उशीरा निदान झाल्यामुळेही पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यात ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, बोन मॅरो बायोप्सी, इमेजिंग, स्कॅनिंग, एक्स-रे अशा अनेक चाचण्या कराव्या लागतात. परंतु, मायलोमा याच्यावरील ठोस उपचार अद्यापही उपलब्ध नाहीत. मात्र, यात स्टेम सेल थेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ट्रायल आणि थेरपी ट्रिटमेंट प्लान्स असे काही बेसिक उपचार केले जातात.

व्यक्तीनुसार याचे उपचार बदलू शकतात आणि रुग्णांचे वय आणि इतर रोगांमुळे उपचारांच्या निर्णयांवर परिणाम करतात. या कर्करोगाचा उपचार म्हणजे 2-3 औषधांसह इंडक्शन किमोथेरपी आणि त्यानंतर रूग्णांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट (BMT) सह मेंटेनन्स थेरपी. लवकर निदान आणि योग्य उपचाराने रुग्णांना नवीन आयुष्य मिळवून देणे शक्य आहे. जर रुग्ण ६० वर्षांखालील असेल आणि तंदुरुस्त असेल तर त्यासाठी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण योग्य राहिल. जर एखाद्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार किमान वर्षभर सुरु ठेवावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com