Meaning Of Ram Ram: राम-राम एकदा नाही तर दोनदा का म्हणतात? अर्थ जाणून घ्या काय आहे यामागील शास्त्र

Ram Ram: एकमेकांना भेटल्यानंतर आपण नमस्कार करतो. हे औपचारिक पारंपारिक अभिवादनाच्या विविध प्रकारांपैकी एक आहे. याचा अर्थ सामान्यतः साष्टांग नमस्कार असा समजला जात असला तरी प्रत्यक्षात ते एकमेकांना आदर दाखवण्यासाठी केलं जातं. नमस्कार करताना अनेकजण दोन्ही हात जोडून राम-राम म्हणत असतात.
Ram Ram meaning
Ram Ram meaning Getty Images
Published On

Meaning Of Ram Ram:

जय श्रीराम, जय श्रीराम म्हण प्रभू राम अयोध्येतील मंदिररात विराजमान झाले. सर्व देशभरातील वातावरण राममय झालं होतं. राम नावाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण कोणाला भेटतो किंवा एखाद्याचा निरोप घेतो तेव्हा आपण राम-राम काय म्हणतो आणि दोनदा राम-राम का म्हटलं जातं? असे प्रश्न मनात आले असतील, तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येथे मिळेल.(Latest News)

एकमेकांना भेटल्यानंतर आपण नमस्कार करतो. हे औपचारिक पारंपारिक अभिवादनाच्या विविध प्रकारांपैकी एक आहे. याचा अर्थ सामान्यतः साष्टांग नमस्कार असा समजला जात असला तरी प्रत्यक्षात ते एकमेकांना आदर दाखवण्यासाठी केलं जातं. नमस्कार करताना अनेकजण दोन्ही हात जोडून राम-राम म्हणत असतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्हीही कुणाला भेटल्यावर राम राम म्हणतो ना? मग रामाचे नाव दोनदा का घेतले जाते? आपण शिव, गणेश, कृष्ण अशा इतर कोणत्याही देवतांची नावे दोनदा का उच्चारत नाही? हिंदू धर्मात सुरुवातीपासूनच हात जोडून नमस्कार करताना राम-राम म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार दोनदा राम राम म्हणण्याचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दोन्ही महत्त्व आहे.

अंकशास्त्रात दोनदा राम राम म्हणण्यामागील संपूर्ण गणित समजवण्यात आले आहे. यानुसार राम राम म्हणणे म्हणजे राम नामाचा १०८ वेळा जप करणे. हिंदी शब्दावलीनुसार “र” २७ व्या स्थानावर आहे. तर, “आ” दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि “म” २५ व्या स्थानावर आहे. अशा स्थितीत जेव्हा एखादी व्यक्ती “राम” म्हणते, तेव्हा संख्येनुसार, एकूण गुणांची संख्या २७ + २ + २५ = ५४ होत असते.

अंकशास्त्रानुसार, जेव्हा "राम राम" एकत्र म्हणतात तेव्हा ते ५४ + ५४ = १०८ संख्या होते. म्हणजेच तुम्ही १०८ वेळा राम रामाचे नाव घेता. धार्मिक मान्यतांमध्ये १०८ हा अंक खूप खास मानला जातो आणि कोणत्याही मंत्राचा १०८ वेळा जप फलदायी ठरतो. म्हणून आपण दोनदा राम राम म्हणत संपूर्ण राम माला जप करत असतो.

टीप : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. साम टीव्ही या गोष्टीला दुजोरा देत नाही किंवा सहमत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com