बंगाली स्टाइलमध्ये अशी बनवा टोमॅटो-मनुक्याची चटणी

चटणीमुळे जेवणाचे ताट जितके सुंदर दिसते तितकीच ती चविष्ट लागते.
chutney recipe, food recipe, kitchen tips
chutney recipe, food recipe, kitchen tipsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या जेवण्याचा ताटातील प्रत्येक स्थान हे ठरलेले असते. त्यातील महत्त्वाचा आणि प्रमुख घटक चटणी.

हे देखील पहा-

चटणीमुळे जेवणाचे ताट जितके सुंदर दिसते तितकीच ती चविष्ट लागते. चटणीशिवाय जेवणाची चव कमी होते असे म्हण्यात काही वावगे ठरणार नाही. चटणीमधे देखील अनेक प्रकार असतात ओली चटणी व सुकी चटणी. पाहायला गेले तर चटण्यांमध्ये काही चटण्या या अगदी रोजच्या आहारातल्या असतात. त्यात पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी अगदी कॉमन आहे. पण आपण कधी बंगाली स्टाइल टोमॅटो आणि मनुक्याची चटणी खाल्ली नसेल. या चटणीची टेस्ट अगदी आंबट गोड लागते. या चटणीला आपण ब्रेड किंवा जाम म्हणून मुलांना खाऊ घालू शकतात.

चटणी बनवण्यासाठी साहित्य

टोमॅटो - १० ते १२

गूळ - पाव वाटी

मनुके - पाव वाटी

काश्मिरी लाल तिखट - १ चमचा

कोरडी लाल मिरची - १ चमचा

चवीनुसार मीठ

तमालपत्र - २

मोहरी -१ चमचा

तेल (Oil) - १ चमचा

chutney recipe, food recipe, kitchen tips
सकाळच्या नाश्त्यासाठी हा आहे योग्य पर्याय

कृती -

- टोमॅटो आणि मनुक्याची चटणी बनवण्यासाठी आपम प्रथम पॅन घेऊन त्यात तेल गरम करुन घ्या.

- तेल गरम झाल्यानंतर त्यात तमालपत्र टाकून ते १ मिनिटे तळून घ्या.

- तमालपत्र भाजल्यानंतर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडायला लागली की, त्यात सुक्या लाल मिरच्या घालून व्यवस्थित तळून घ्या.

- त्यानंतर टोमॅटो नीट धुवून घ्या व टोमॅटोचे छोटे तुकडे करा.

- आता तयार मसाल्यात टोमॅटोचे तुकडे घाला. नंतर काश्मिरी लाल तिखट, गूळ (Jaggery), मनुके आणि मीठ घाला. सर्व गोष्टी नीट मिसळा.

- झाकण ठेवून मिश्रण १५ मिनिटे नीट शिजू द्या किंवा घट्ट होईपर्यंत शिजवा.

बंगाली स्टाइल टोमॅटो मनुक्याची चटणी तयार आहे. आपणही डाळ, भात (Rice) आणि बिर्याणी यांसारख्या पदार्थांसोबत सर्व्ह करू शकतो.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com