मुंबई : आज ८ मे २०२२ रोजी देशभरात सर्वत्र मातृदिन साजरा केला जाईल. आई (Mother) ही सर्वांसाठी खास असते तिच्यासाठी प्रत्येक दिवस हा खास असतो. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी आपण आपल्या आईला बऱ्याच भेटवस्तू देतो तसेच तिच्याबद्दल असणारे प्रेमही व्यक्त करतो. यंदा 'मदर डे' च्या निमिताने आपण आपल्या आईसाठी काही खास गोष्टी करू शकतो. गोड डिश म्हणून चॉकलेट केक बनवून तुम्ही तुमच्या आईला सरप्राईज देऊ शकता. तुम्ही पहिल्यांदा केक (Cake) बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला सोपा आणि सध्या पद्धतीने केक कसा बनवावा हे सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही 'मदर्स डे' ला खूप खास बनवू शकता.
हे देखील पहा -
असा बनवा स्पेशल केक
साहित्य -
मैदा - १ कप
पिठी साखर - १/२ कप
दूध - १/२ कप
कोको पावडर - १/४ कप
व्हॅनिला एसेन्स - १ मोठा चमचा
बेकिंग सोडा - १ छोटा चमचा
बेकिंग पावडर - १ छोटा चमचा
व्हिप्ड क्रीम - १ कप
डार्क चॉकलेट - १०० ग्रॅम
तेल - १/४ कप
मीठ
सजावटीसाठी स्लिवर बॉल्स
कृती -
चॉकलेट (chocolate) केक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात मैद्याचे पीठ त्यात पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर आणि चिमूटभर मीठ मिसळा. त्यानंतर हे मिश्रण चाळून घ्या. आता एका वेगळ्या भांड्यात साखर आणि तेल घालून चांगले फेटून घ्या. यानंतर मैद्याचे मिश्रण आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण चांगले मिक्स करा. आता थोडे थोडे दूध घालून मिश्रण तयार करा. नंतर केकच्या साच्याला थोडे तेलाने ग्रीस करा. त्यानंतर त्यावर थोडे पीठ शिंपडा. आता त्यात तयार केलेले मिश्रण घालून ओव्हन गरम करा. ओव्हन गरम झाल्यावर त्यात केक मोल्ड ठेवा. ओव्हन १८० अंशांवर सेट करुन २५ मिनिटे केक बेक करू द्या. केक ओव्हनमधून बाहेर काढा आणि थंड होण्यास ठेवा. त्यानंतर व्हिप्ड क्रीम फेटून घ्या. एका भांड्यात डार्क चॉकलेट घेऊन त्यात २ चमचे गरम दूध आणि बटर घालून पेस्ट तयार करा. त्यानंतर एका भांड्यात अर्धा कप पाणी आणि ३ चमचे साखर घालून साखरेचा पाक तयार करा. यानंतर केकचे तीन थर कापा. प्रत्येक थराला साखरेचे पाक लावून सर्व बाजूंनी चांगले पसरवा. शुगर कोट आणि क्रीम लावून केक सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा.
केक सेट झाल्यानंतर फ्रीजमधून काढा आणि त्यावर तयार चॉकलेट पेस्ट पसरवा. केक पुन्हा अर्धा तास सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. आता पाईपिंग बॅगमध्ये व्हिप्ड क्रीम भरुन डिजाईन करा आणि वरुन स्लिवर बॉल्स पसरवा.
अशा प्रकारे तुमचा मदर्स डे स्पेशल केक तयार होईल.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.