एखादी व्यक्ती अशी असते, ज्याला जन्मतः एकच किडनी असते. मात्र आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, मुंबईमध्ये एक असं कुटुंब आहे, ज्या कुटुंबातील सर्व सदस्यांना एक-एक किडनी आहे तर....! ही गोष्ट तुम्हाला थोडी आश्चर्यकारक वाटेल, मात्र हे खरं आहे.
मुंबईच्या पवईमध्ये राहणारं वाघमारे कुटुंब...या कुटुंबामध्ये ४ जणं राहत असून प्रत्येक व्यक्तीला केवळ एकच किडनी आहे. असं नाही की, या कुटुंबातील व्यक्तींना जन्मतःच एक किडनी आहे. गोष्ट अशी आहे की, वाघमारे दाम्पत्याने त्यांची एक-एक किडनी आपल्या मुलांना दान केली आहे. या मुलांचं किडनी प्रत्यारोपण झाल्यावर त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाला माहिती देताना दोन्ही मुलांचे पिता दीपक म्हणाले की, मी दोन वर्षांपूर्वी मिरजमध्ये लेमन सोडा ड्रिंक युनीट चालवायचो. मात्र माझी मुलगी शोभा सतत आजारी पडू लागली. त्यानंतर आम्ही मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.
वाघमारे यांनी अनेक डॉक्टरांकडे जाऊनही त्यांची मुलगी शोभा हिचे वजन कमी होतं होतं. याशिवाय तिला सतत तापही येत होता. मात्र यामागील नेमकं कारण समोर येईनात.
नानावटी रूग्णालयातील नेफ्रोलॉजिस्ट डॉ जतिन कोठारी म्हणाले, 'शोभा एक वर्षापूर्वी नानावटी हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा किडनी निकामी झाल्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. अनेक टेस्टमधून असं समोर आलं की, हे एक जेनेटिक म्युटेशन आहे. ही समस्या त्यांच्या पालकांना नव्हती. यावेळी भावाची टेस्ट केली असता, त्याला देखील हा जेनेटीक आजार असल्याचं समोर आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शोभाला तिच्या वडिलांनी किडनी दान केली. मात्र ब्लड ग्रुपच्या पेचात अडकल्याने शोभाचा भाऊ अनिकेतचं किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकलं नाही. अनिकेतचा रक्तगट O होता तर त्याच्या आईचा रक्तगट B होता. डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, अनिकेतला O डोनर मिळणं अधिक योग्य आहे.
डॉ कोठारी म्हणाले, 'आम्ही स्वॅप ट्रान्सप्लांटचा पर्याय शोधायला सुरुवात केली. पण O डोनर शोधणं सोपं नव्हतं.
सुमारे तीन महिन्यांनंतर, वाघमारे यांना एक डोनर सापडला. एक ओ ब्लड ग्रुप असणारी नर्स जी तिच्या पतीला एक किडनी दान करणार होती. तिचा पती एक जनरल सर्जन होता. त्यांनी कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शोभाची आई पल्लवी यांनी सर्जनला किडनी दान केली, तर नर्सने अनिकेतला किडनी दान केली.
दीपक यांच्या सांगण्यांनुसार, 'अनिकेत बरा होतो. मात्र प्रत्यारोपणानंतर त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर राहावं लागेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.