Maharashtra Bhushan Award Winners : महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कोणी केली; या पुरस्काराचे प्रथम मानकरी कोण?

साल १९९५ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे संयुक्त सरकार असताना महाराष्ट्र भूषण पुरस्काराला प्रथम स्वरूप देण्यात आले.
Maharashtra Bhushan Award Winners
Maharashtra Bhushan Award Winners Saam TV
Published On

Maharashtra Bhushan Award : कला,साहित्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा साल २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. १६ एप्रिल रोजी नवी मुंबईमधील खारघर येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर सदर कार्यक्रम पार पडणार आहे. (Marathi News)

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर होताच या पुरस्काराविषयी जाणून घेण्यासाठी नागरिकांच्या मनामध्ये आणखीनच कुतूहल वाढले आहे. हा पुरस्कार नेमका कोणी सुरु केला. पुरस्काराचे प्रथम मानकरी कोण ठरले. आजवर किती कलावंतांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. एकंदर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा इतिहास या बातमीमधून जाणून घेणार आहोत.

Maharashtra Bhushan Award Winners
ज्येष्ठ निरुपणकार Appasaheb Dharmadhikari यांचं नेमकं कार्य काय ? जाणून घ्या...

महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणारा सर्वात मोठा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Award) हा प्रथम पुरस्कार आहे. साल १९९५ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे संयुक्त सरकार असताना महाराष्ट्र भूषण पुरस्काराला प्रथम स्वरूप देण्यात आले. साल १९९६ मध्ये पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

कोणत्या क्षेत्रामधील व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुस्कार दिला जातो?

साहित्य

कला

खेळा

विज्ञान

समाज सेवा

पत्रकारिता

सार्वजनिक प्रशासन

आरोग्य कार्य

Maharashtra Bhushan Award Winners
Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award LIVE| अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण

महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना साल १९९६ मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र भूषण पुस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर लता मंगेशकर यांना -१९९७, विजय भटकर - १९९९, सचिन तेंडुलकर- २००१, भीमसेन जोशी-२००२, अभय बंग आणि राणी बंग - २००३, बाबा आमटे - २००४, रघुनाथ अनंत माशेलकर - २००५, रतन टाटा - २००६, आर.कृ. पाटील - २००७, नानासाहेब धर्माधिकारी - २००८, मंगेश पाडगावकर - २००८, सुलोचनादीदी -२००९ , जयंत नारळीकर - २०१०, अनिल काकोडकर - २०११, बळवंत मोरेश्वर पुरंदरे - २०१५, आशा भोसले - २०२१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com