Mahalakshmi Yog: मिथुन राशीत तयार होणार महालक्ष्मी योग; लक्ष्मी देवीची 'या' राशींवर राहणार कृपा, हाती पैसाही येणार!

Mahalakshmi Yog In Mithun: मंगळ आणि चंद्र हे दोन्ही ग्रह एकाच राशीत एकत्र आल्यामुळे महालक्ष्मी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो.
Mahalakshmi Yog In Mithun
Mahalakshmi Yog In MithunSaam tv
Published On

Mahalakshmi Yog In Mithun: ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये गोचर करतात. यामध्ये सर्वात वेगाने फिरणारा ग्रह हा चंद्र असून तो एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. इतर ग्रहाशी संयोग झाल्याने राजयोग तयार होतो.

असंच मंगळ आणि चंद्र हे दोन्ही ग्रह एकाच राशीत एकत्र आल्यामुळे महालक्ष्मी योग तयार होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना धन, कीर्ती, पद मिळू शकणार आहे. मिथुन राशीमध्ये चंद्र आणि मंगळाच्या संयोगाने तयार झालेला महालक्ष्मी योग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो हे जाणून घेऊया.

हिंदू पंचांगानुसार, पंचांगानुसार 27 ऑगस्ट रोजी पहाटे 3.41 वाजता चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. यानंतर 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11:34 वाजता चंद्र मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आधीच मिथुन राशीत असल्याने अशा स्थितीत 30 ऑगस्टपर्यंत महालक्ष्मी योग तयार होणार आहे.

कन्या रास (Kanya Zodiac)

या राशीच्या दहाव्या घरात महालक्ष्मी योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकणार आहे. आर्थिक लाभासोबतच करिअरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचं मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. फार पूर्वी केलेली गुंतवणूक आता चांगला परतावा देऊ शकणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

कुंभ रास (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी योग लाभदायक ठरू शकणार आहे. लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतील. या राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभासोबत उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार आहेत. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुमचा व्यवसाय परदेशात असेल तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

धनु रास (Dhanu Zodiac)

या राशीच्या लोकांसाठीही महालक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला अनेक माध्यमातून आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com