Maggi Masala Recipe: घरच्या घरी मॅगी मसाला बनवणं झालं सोप्प; वाचा संपूर्ण रेसिपी

How To Make Maggi Masala at Home: घरच्या घरी आणि तेही केमीकलशिवाय अगदी सोप्या पद्धतीने मॅगी मसाला बनवता येतो.
Maggi Masala
Maggi MasalaSaam TV
Published On

Maggi Masala Recipe: मॅगी खाणे प्रत्येक व्यक्तीला आवडते. मॅगीची चव वाढते ती त्यात असलेल्या मसाल्यांनी. त्यामुळे चटपटीत मसाल्याच्या मॅगीवर सगळेच ताव मारतात. मॅगी बनवण्यासाठी त्या पाकीटातच मसाला देखील मिळतो. मसाला पाकीटात जास्तीत जास्त दिवस टीकून रहावा आणि खराब होऊनये यासाठी त्यावर केमीकलचा फवारा केला जातो. तसेच यात अजिनामोटो देखील मिसळलेला असतो. ही मॅगी एक महिना आरामात जशीच्या तशी राहते. (Latest Marathi News)

चविला चमचमीत लागत असली तरी मसाल्यात केमीकल असल्यााने ही मॅगी आरोग्यास घातक आहे. आता असे असले तरी जीभेचे चोचले पुरवण्यासाठी सर्वच जण या मॅगीवर ताव मारतात. मात्र आम्ही तुमच्यासाठी मॅगी मसाला घरच्या घरी कसा बनवायचा याची माहिती शोधली आहे. घरच्या घरी आणि तेही केमीकलशिवाय अगदी सोप्या पद्धतीने मॅगी मसाला बनवता येतो.

Maggi Masala
Kolhapur Crime News: खळबळजनक! पोलिसांच्या छाप्यानंतर दोघांच्या इमारतीवरून उड्या, एकाचा मृत्यू

चविष्ट मॅगी मसाला बनवण्यासाठी सामग्री

यासाठी तुम्हाला १ टीस्पून सुंठ पावडर, एक कांदा, २ टीस्पून पावडर , २ टीस्पून लसूण, कॉर्न फ्लोअर १ टीस्पून, साखर पावडर १ टीस्पून, सुक्या कैरीची पावडर २ टीस्पून, मेथी दाणे अर्धा चमचा, लाल तिखट ३, संपूर्ण धणे १ चमचा, जायफळ पावडर ½ टीस्पून, सायट्रिक ऍसिड ½ टीस्पून, हळद पावडर १ टीस्पून मोठा चमचा, जिरे २ चमचे, काळी मिरी २ चमचे,तमालपत्र ५-६ आणि चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स २ टीस्पून इत्यादी सामग्री लागते.

मॅगी (Maggi) मसाला बनवण्याची पद्धतही सोपी आहे. त्यासाठी एका मिक्सरचं भांडं घ्या. ते पूर्ण कोरडं असणे आवश्यक. या भांड्यात कांदा पावडर, लसूण पावडर, धनेपूड, लाल तिखट, जिरेपूड,मेथी पावडर, कॉर्न फ्लोअर, अख्खी लाल तिखट, हळद, सुकी कैरी पावडर, काळी मिरी पावडर, धणे, मीठ आणि साखर हे एकत्र बारीक करुन घ्या. सर्व सामग्री बारीक केल्यानंतर एका काचेच्या भांड्यात ते ठेवा. तसेच त्यावर सायट्रिक अॅसीड देखील टाका.

Maggi Masala
Pune Crime: MPSC पास तरुणीचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह! पुण्यात खळबळ; ८ दिवसांपासून...

हा मसाला तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलात तर तो २ महिने सारख्याच चवीचा लागेल. मसाला अजिबात खराब नाही होणार. जर तुम्ही काचेच्या बरणीत ठेवून मसाला बाहेरच ठेवलात तर तो एक महिना चांगला टीकेल. हा मॅगी मसाला फक्त मॅगी बनवण्यासाठीच नाही तर पास्ता, न्यूडल्स यासह वेगवेगळ्या भाज्या बनवण्यासाठी देखील वापरता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com