WhatsApp New Feature: फेसबुक आणि इंस्टाग्राम प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपने आणले कधीही न वापरलेले फिचर ; मार्क झुकरबर्ग यांनी स्वत: केले जाहीर

कस्टमाइज्ड डिजिटल अवतार क्रिएट करण्यासाठी हे फिचर फार फायदेशीर ठरणार आहे.
WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureSaam TV

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पुन्हा एकदा नवीन फिचर अॅड होत आहे. कंपनीचे सीईओ मार्कस झुकरबर्ग यांनी स्वत: या विषयी माहिती दिली. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हे नवीन फिचर आधीच सुरु झाले आहे. यात कस्टमाइज्ड डिजिटल अवतार क्रिएट करण्यासाठी हे फिचर फार फायदेशीर ठरणार आहे. (Latest Marathi News)

अवतार फिचरमुळे तुम्हाला कस्टमाइज डिजिटल अवतारसह कस्टमाइज करता येईल. यात तुम्ही तुमच्या पसंती नुसार हेअर स्टाईल, कपडे इत्यादी निवडू शकता. या अवतार फोटोचा तुम्हाला अनेक ठिकाणी फायदा होतो. अनेक व्यक्ती आपल्या प्रोफाईल फोटोसाठी देखील हाच फोटो निवडतात.

प्रत्येक युजरसाठी व्हॉट्सअॅपवर ३६ कस्टम स्टिकर्स असतील. यात ऍक्शन आणि इमोषण नुसार एका वेळी एकच स्टिकर निवडण्याची मुभा आहे. स्टिकर क्रियेट केल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांना अथवा कुटुंबीयांना ते शेअर करु शकता. वॉट्सअॅपच्या या फिचरमध्ये लवकरच आणखीन नवीन फिचर ऍड होणार आहेत. अवतरासाठी यामध्ये विविध हेअरस्टाईल, लाईटींग असे आणखीन नवीन फिचर लवकरच ऍड होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

कंपनीने हे फिचर सर्वांसाठी एकत्र सुरु केले नाही. काही ठरावीक ऍन्ड्रॉइडफोनमध्ये फिचर सुरु करण्यात आले आहे. हळूहळू सर्वांच्या फोनमध्ये फिचर अपडेट होत आहे. हे फिचर वापरणे अगदीच सोपे आहे. यासाठी व्हॉट्सअॅपवर स्टिकर ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्व आवतार मिळतील. अवतारच्या स्टिकरवर क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व स्टिकर पाहता येतील तसेच त्यात बदल करता येतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com