महिलांनो, प्रेग्नेसी किट वापरण्यापुर्वी 'या' गोष्टी माहित करुन घ्या

प्रेग्नेसी किटचा (Pregnancy kit) ) वापर करताना निकाल येण्यासाठी साधारण ९ किंवा १० मिनिट ३० चा कालावधी लागतो.
महिलांनो, प्रेग्नेसी किट वापरण्यापुर्वी 'या' गोष्टी माहित करुन घ्या
महिलांनो, प्रेग्नेसी किट वापरण्यापुर्वी 'या' गोष्टी माहित करुन घ्याSaam tv news
Published On

महिलांमध्ये आई (Mother) होण्याची भावनाच अप्रतिम असते. त्यात जर आपण पहिल्यांदा आई होणार असाल तर तो आनंद गगनात मावेनासा होतो. पण अनेकदा महिलांना त्या आई होणार असल्याचे संकेत उशीराने मिळतात किंवा गर्भधारणा झाल्याचे त्यांना वेळेत कळून येत नाही. अशा वेळी गर्भधारणा कन्फर्म करण्यासाठी महिली प्रेग्नेसी किटचा (Pregnancy kit) वापर करतात. पण काही चुकांमुळे किटद्वारे मिळालेले परिणामही चुकीचे असू शकतात. त्यामुळे गर्भधारणा किट म्हणजेच प्रेग्नेसी किट वापरताना काही गोष्टीची माहिती असणे खुप गरजेचे आहे. (Ladies, know these things before using a pregnancy kit)

प्रेग्नेसी किटद्वारे महिलांच्या मूत्रातील एचसीजी संप्रेरकाची पातळी (Human Chorionic Gonadotrophin) मोजली जाते. जर एखाद्या महिलेच्या मूत्रात एचसीजी संप्रेरक असेल तर ती गर्भवती होण्याची दाट शक्यता असते.

महिलांनो, प्रेग्नेसी किट वापरण्यापुर्वी 'या' गोष्टी माहित करुन घ्या
उघड्यावरचे चमचमीत पदार्थ खाताय? मग ही बातमी एकदा वाचाच

गर्भधारणा किट वापरण्यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

गर्भधारणा चाचणीपूर्वी, याचा योग्यप्रकारे कसा वापर करावा हे आपल्याला माहित असले पाहिजे. अन्यथा, मिळालेला निकाल चुकीचाही असू शकताे.

प्रेग्नेसी किट वापरण्याची योग्य पद्धत

अनेकदा बाजारात उपलब्ध असलेले प्रेग्नेसी किट त्याच प्रकारे वापरले जातात. परंतु तरीही प्रत्येक किटच्या वापरामध्ये थोडासा फरक असू शकतो. प्रेग्नन्सी किट वापरण्याची माहिती प्रत्येक पॅकेटवर देण्यात आली आहे. म्हणूनच, गर्भधारणा चाचणी करण्यापूर्वी, कृपया किटवर दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचून त्यानुसार चाचणी करा.

घड्याळाचा वापर

प्रेग्नेसीचा निकाल परिणाम येण्यासाठी कागही कालावधी लागतो. अशावेळी तुम्ही घडयाळाचा वापर करु शकता. प्रेग्नेसी किटचा वापर करताना निकाल येण्यासाठी साधारण ९ किंवा १० मिनिट ३० चा कालावधी लागतो. मात्र उत्साहाच्या भरात घाई केल्यास चुकीचाही परिणाम समोर येऊ शकतो.

सकाळचे प्रथम मूत्र वापरा

गर्भावस्थेची चाचणी करण्यासाठी महिलांनी सकाळच्या पहिल्या लघवीपासून चाचणी करावी. कारण यावेळी मूत्रात एचसीजी संप्रेरकाची पातळी जास्त असते, ज्यामुळे गर्भधारणेच्या चाचणीचा परिणाम अचूक होण्याची शक्यता वाढते. जर आपणास सकाळी चाचणी करणे शक्य झाले नसेल तर काळजी करू नका. प्रेग्नेसी चाचणी करण्यासाठी चार तास लघवी करू नये आणि त्या चाचणीसाठी मूत्राचे नमुन घ्या.

किटमध्ये दिलेलाच कप वापरा

बर्‍याच स्त्रिया किटमध्ये उपस्थित कप वापरण्यास संकोचतात. परंतु आपला हा संकोच चुकीचा परिणाम देऊ शकतो. त्यामुळे किटमध्ये मिळालेल्या कपमध्ये मूत्र साठवून चाचणी करा. तसेच टेस्टचा अचूक परिणाम मिळवण्यासाठी किटवर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा योग्य पद्धतीने अवलंब करा.

टोल क्रमांकावर देखील कॉल करू शकता

जर तुम्हाला या किट वापरण्यास अडचणी येत असतील किंवा काही शंका वाटत असेल तर, आपण किटवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकता. यावर कॉल करण्यास अजिबात संकोच करू नका. कस्टमर केअरला फोन करुन तुमची अडचण अगदी निसंकोच सांगा आणि पुन्हा चाचणी करा.

(टिपः येथे प्रदान केलेली माहिती ही केवळ शिक्षणाच्या उद्देशाने दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com