After Breakup : ब्रेकअपचा फक्त मनावर नाही तर शरीरावरही होतो परिणाम, जाणून घ्या

Relationship Breaks : अनेक व्यक्ती असा विचार करतात की ब्रेकअप नंतर मेंदूवर किंवा मेंदूच्या स्वास्थ्यावर ब्रेकअपचा प्रभाव पडतो.
After Breakup
After Breakup Saam Tv

After Breakup Health : अनेक व्यक्ती असा विचार करतात की ब्रेकअप नंतर मेंदूवर किंवा मेंदूच्या स्वास्थ्यावर ब्रेकअपचा प्रभाव पडतो, परंतु असे अजिबात नसते. मेंटल हेल्थ सोबतच ब्रेकअप झालेल्या व्यक्तीच्या बॉडीवर देखील इफेक्ट पडतो.

ब्रेकअप (Breakup) हा प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात वाईट क्षण आहे. ज्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. ब्रेकअपनंतर कोणत्याच कामांमध्ये मन लागत नाही. सोबतच एकटे राहणे आणि जेवण न करणे किंवा जेवण टाकने अशा प्रकारची नाटक ब्रेकअप झालेला प्रत्येक व्यक्ती करतो.

अनेक व्यक्ती असं मानतात की, मेंदू आणि त्याच्या स्वास्थ्यावर (Health) याचा प्रभाव पडतो, परंतु असे अजिबात नसते. मेंटलहेल्थ सोबतच तुमच्या शरीरावर देखील याचा परिणाम पाहायला मिळतो.

After Breakup
Shocking Breakup Fact : अरेच्चा ! आता फेसबुक-इन्स्टाग्राम सांगणार तुमच्या नात्याचे भविष्य...

ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हणजे काय?

ही हृदयासंबंधीची एक कंडिशन आहे ज्यामध्ये स्ट्रेससोबत तुमचे इमोशन्स देखील वाढू लागतात. यामुळे शारीरिक समस्या देखील होतात ज्यामध्ये हार्ट अटॅक येण्याची जास्त संभावना असते.

अनेक एक्स्पर्ट याला स्ट्रेस कार्डिओमायोपैथी आणि एपिकल बलूनिंग सिंड्रोम या नावाने ओळखतात. याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे छातीमध्ये दुखणे आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे होय.

ब्रेकअप झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर कोणत्या प्रकारचा प्रभाव पडतो -

एक्सपर्ट सांगतात की ब्रेकअप झाल्यानंतर मेंटल चेस्ट पेन, श्वास घेण्यासाठी अडचण, हार्ट फेलियर, हृदयामध्ये ब्लड कलॉट्स आणि ब्लड प्रेशरची लक्षणे दिसू शकतात. अनेक व्यक्ती याला मानसिक समस्या समजतात आणि शारीरिक स्वास्थ्यासंबंधीतच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात.

After Breakup
Ask yourself these questions before Breakup : ब्रेकअप करण्यापूर्वी स्वत: ला विचारा 'हे' प्रश्न

ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी -

ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी मेडिटेशन, योगा, पुस्तके वाचणे किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर आणि स्वतःच्या फॅमिली सोबत वेळ घालवला पाहिजे. त्याचबरोबर चुकूनसुद्धा सिगारेट आणि दारू सारख्या वाईट सवयींना अंगी लावून घेऊ नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com