Saree Draping : पहिल्यांदाच साडी चापूनचोपून नेसायची कशी? 'या' खास टिप्स फॉलो करा..

Saree Draping Tips : साडी कशी नेसायची जाणून घ्या...
Saree Draping Tips
Saree DrapingSAAM TV
Published On
The beauty of women
The beauty of womenYandex

स्त्रियांचे सौंदर्य

स्त्रीचे सौंदर्य साडीमध्ये जास्त खुलून येते. साडी हा स्त्रियांचा भारतीय पोशाख आहे. पण आजकाल अनेकांना साडी नेसण्याची सवय नसते.

The world of running
The world of runningYandex

धावपळीचे जग

रोज धावपळीच्या जगात साडी नेसणे कमी झाले आहे. आता साडी फक्त एखाद्या प्रसंगाला, लग्न समारंभाला नेसली जाते.

How exactly to wear a saree?
How exactly to wear a saree?Yandex

नेमकी साडी नेसायची कशी?

साडीच्या कमी वापरामुळे आजकाल अनेक मुलींना 'नेमकी साडी नेसायची कशी?' हा प्रश्न पडतो. चला तर मग आज आपण पहिल्यांदाच साडी कशी नेसावी आणि सुंदर लूक कसा तयार करावा जाणून घेऊयात.

Right choice of saree
Right choice of sareeYandex

साडीची योग्य निवड

जर तुम्ही पहिल्यांदा साडी नेसत असाल तर हलक्या कपड्याची साडी निवडावी. उदा.कॉटन,शिफॉन. भरजरी साडी नेसणे शक्यतो टाळावे. कारण ती सांभाळणे कठीण जाते. हलकी साडी तुम्ही सहज सांभाळू शकता.

Selection of blouses
Selection of blousesYandex

ब्लाउजची निवड

पहिल्यांदाच साडी नेसल्यावर खास लुक करायचा असेल, तर स्टाईलीश आणि साडीला शोभेल अशा ब्लाउजची निवड करा. उदा. शर्ट स्टाईलिश ब्लाउज

Petticoat must be worn.
Petticoat must be worn.Yandex

पेटीकोट आवर्जून घाला

आजकालच्या मुलींना जीन्सवर साडी बांधण्याची सवय असते. पण हे चुकीचे आहे. साडी नेसण्यासाठी योग्य फिटिंगचा आणि मॅचिंग पेटीकोट घालणे कधीही चांगले असते. यामुळे साडीतून तुमचे रुप खुलून येते.

Proper tying of saree
Proper tying of sareeYandex

साडी योग्य पद्धतीने बांधणे

साडी नेसण्यासोबतच ती शेवटपर्यंत टिकवणे किंवा सांभाळणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे साडी नेसताना पिनांच्या साहाय्याने नीट बांधून घ्यावी. यामुळे तुम्ही कार्यक्रमात पूर्ण आत्मविश्वासाने साडीमध्ये फिरू शकता.

Saree styles
Saree stylesYandex

साडीच्या निऱ्या

साडीच्या निऱ्या काढणे हा साडी नेसताना सर्वात अवघड भाग असतो. यासाठी तुम्ही आधीच साडीच्या निऱ्या काढून घ्या. यामुळे साडी नेसणे खूप सोपे जाईल आणि साडीचा लूकही परफेक्ट दिसेल.

Makeup and hair style
Makeup and hair styleYandex

मेकअप आणि हेअर स्टाईल

कोणत्याही साडीचा लूक मेकअप आणि हेअर स्टाईल शिवाय अपूर्ण आहे. साडीला मॅचिंग ज्वेलरी घालून छाम मेकअप करावा. पहिल्यांदा साडी नेसत असल्यास थोडा हलका मेकअप करा. तसेच सांभाळायला सोपी जाईल अशी हेअर स्टाईल करून आपला लूक पूर्ण करा.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टिव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com