अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न स्टोअर करणे ठरते धोकादायक

अॅल्युमिनियम फॉइल आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम
It is dangerous to store food in aluminum foil
It is dangerous to store food in aluminum foilब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बहुतांश लोक टिफिन पॅक करणे आणि अन्न स्टोअर करण्यासाठी सामान्यतः अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. आपल्याला असं वाटतं की, यामुळे अन्न बराच वेळ ताजे राहते.

हे देखील पहा -

अॅल्युमिनियम फॉइल पेपरमध्ये रसायन असते जे अन्नाला दूषित करते. आपण ते अन्न खातो व त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या संबंधित इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी अन्नपदार्थ गरम राहण्यासाठी आपण अॅल्युमिनियम फॉइलचा वापर न केलेला चांगला आहे. याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.

१. अॅल्युमिनियम फॉइलचा अधिक प्रमाणात वापर केला तर यामुळे न्यूरोपॅथोलॉजिकल प्रतिक्रियेसाठी खूप जास्त धोका वाढतो. शिजवलेलं अन्न काच किंवा चिनी मातीच्या भांड्यांमध्ये साठविणे जास्त सुरक्षित ठरते.

It is dangerous to store food in aluminum foil
उंच दिसण्यासाठी वापरून पाहा काही फॅशन टिप्स

२. अन्न थंड झाल्यानंतर आपण ते फॉइल पेपरमध्ये साठवून ठेवतो. प्रत्येक पदार्थ साठवण्याची एक वेळ असते. त्यानंतर तो पदार्थ त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून बॅक्टेरियांना शोषून घेण्यास सुरुवात करतो. अन्न कसे साठवावे ? आपल्या पदार्थामध्ये असणारे तेल आणि मसाले अॅल्युमिनियमबरोबर प्रतिक्रिया करण्यास सुरुवात करतात. ज्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आहारातील असे काही बॅक्टेरिया जे अधिक तापमानात मरत नाहीत. ते आपल्या शरीरात विषारी घटक निर्माण करतात आणि असे पदार्थ खाण्यामुळे आजार होतात.

३. एखादा गरम पदार्थ आपण खूप वेळासाठी खोलीच्या तापमानाला ठेवतो, तेव्हा पहिले दोन तास त्यामध्ये खूप बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. आपले अन्नपदार्थ बॅक्टेरियांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी हवाबंद कंटेनर वापरा, जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही.

४. दुग्धजन्य पदार्थ आणि मांसाहारी उत्पादनं यामध्ये बॅक्टेरिया खूप वेगाने वाढतात. म्हणून त्यांची साठवणूक करताना अधिक काळजी घ्यावी.

५. तीन तासांहून अधिक काळ बाहेर ठेवलेले पदार्थ (Food) आरोग्यासाठी (Health) सुरक्षित नसतात. अशा पदार्थाचे सेवन करू नका, ते आपल्याला आजारी पाडतील.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com