Husband Running Away From Household Work : घरातील कामांपासून तुमचा नवरा पळ काढतोय? 'या' टिप्स करतील मदत...

घरातील कामे नवरा आणि बायको दोघांनी मिळून केली तर लवकर पूर्ण होतात.
Husband Running Away From Household Work
Husband Running Away From Household Work Saam Tv
Published On

Husband Running Away From Household Work : घरातील कामे नवरा आणि बायको दोघांनी मिळून केली तर लवकर पूर्ण होतात.तेवढाच एकमेकांना सोबत वेळ घालवता येतो आजकाल च्या धावपळीच्या जीवनात वेळ देणे खूप अवघड झाले आहे.

अशा परिस्थितीत तुम्ही दोघे सोबत घरचे (Home) काम करून एकमेकांसोबत वेळ घालवू शकता परंतु तुमचा जोडीदार (Partner) तुमच्या घर कामात मदत करत नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होते, राग येतो पण त्याचे काम न करण्याचे नक्की कारण काय असू शकते.

Husband Running Away From Household Work
Husband Wife Relationship Tips : स्त्री-पुरुषांनी झोपण्यापूर्वी करू नका 'ही' कामे, आयुष्यात वाढतील अनेक समस्या

घरातील कामे वाटून घ्या -

घरातील कामाची जबाबदारी तुमच्या जोडीदारांसोबत वाटून घ्या त्या कामाची यादी बनवा त्यामध्ये कोणाला किती व कोणते काम करायचे आहे याची नोंद करा. त्याने तुमच्या जोडीदारावर जबाबदारी असेल त्यामुळे तो त्याची कामे टाळून इकडे तिकडे जाण्याचा विचार करणार नाही.

आळशी पार्टनरला धमकी देऊ नका -

तुमचा जोडीदार सतत घराची कामे करण्यास नकार देत असेल तर त्याला धमकावून कामे करून घेऊ नका. त्याला त्याचा पूर्ण वेळ दया. पण त्याला असे वाटले पाहिजे हे काम आता आपल्यालाच पूर्ण करायचे आहे त्यामुळे तो ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.

Husband Running Away From Household Work
Relation With Mother In Law : तुमची सासू प्रत्येक गोष्टीवर चिडते ? फॉलो करा 'या' टिप्स

पार्टनरच्या समस्या जाणून घ्या -

तुमच्या जोडीदारासोबत बोलून त्यांच्या समस्या समजून घ्या.नात्यानं मध्ये होणारे वाद एकमेकांना समजून घेतल्याने सुटतात.तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काम करून घेयायचे असेल तर आधी त्यांना समजून घ्या आणि त्यानुसार त्यांच्याकडून काम करून घ्या.

पार्टनरने काम केल्यास त्यांची स्तुती करा -

तुमच्या आळशी जोडीदाराने एखादे काम केल्यावर त्याची स्तुती करा त्याला आणखी प्रोत्साहन दया.त्याने कोणते काम केल्यावर त्याला खीली उडवू नका.याने त्याला काम करण्यात रस राहणार नाही.त्यामुळे नेहमी त्यांनी केलेल्या कामाची वावा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com