Earthen Pots Benefits: मातीच्या भांड्यात जेवण बनवणे फायद्याचे की, तोट्याचे ? जाणून घ्या सविस्तर

Benefits Of Earthen Pots: आता घरोघरी फक्त मातीचे माठ आपल्याला पाहायला मिळतात.
Earthen Pots
Earthen PotsSaam Tv

Clay Pots Benefits: भारतात मातीच्या भांड्यांच्या वापर अधिक केला जातो. परंतु सध्याच्या काळात स्टेनलेस स्टील व अॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली आहे. आता घरोघरी फक्त मातीचे माठ आपल्याला पाहायला मिळतात.

मात्र, तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरणे सर्वात सुरक्षित मानले जाते. मातीच्या भांड्यांचे एक वैशिष्ट्य आहे की ते खूप सच्छिद्र असतात. यामुळेच त्यात तयार केलेला पदार्थ चवदार तर असतोच शिवाय आरोग्यदायीही (Health) असतो. मातीच्या भांड्यांमध्ये कोणतेही हानिकारक रसायन नसते. मात्र, त्यात स्वयंपाक करताना काही गोष्टींची काळजी (Care) घेणे आवश्यक आहे.

Earthen Pots
Benefits of Clay Pot Water : माठातल्या पाण्यात दडलाय 'आरोग्याचा खजिना' !

मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

1. मातीचे भांडे वापरण्यापूर्वी, ते काही तास पाण्यात (Water) भिजत ठेवा. कारण मातीची भांडी सच्छिद्र असतात. त्यांना पाण्यात भिजवून ठेवल्यास ते ओलसर राहतील. स्वयंपाक करण्यासाठी, भांडी पाण्यातून बाहेर काढा आणि स्वच्छ (Clean) कापडाने पुसून घ्या. नंतर त्यात पाणी भरून गॅसवर मंद आचेवर ठेवा. यानंतर, 2 मिनिटे गरम केल्यानंतर, पाणी फेकून द्या. आता तुम्ही स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरू शकता.

2. आजकाल घरी वापरल्या जाणार्‍या स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये उच्च आचेवर अन्न शिजवले जाते. मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करताना हे अजिबात करण्याची गरज नाही. अन्न नेहमी मातीच्या भांड्यात कमी किंवा मध्यम आचेवर शिजवावे. मंद आचेवर अन्न शिजविल्यास जेवण चवदार होईल आणि चांगले शिजवले जाईल.

Earthen Pots
Benefits of Dried Amla : सुकलेल्या आवळ्यात दडलयं आरोग्याच रहस्य...!

3. मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न (Food) ढवळण्यासाठी लाकडी किंवा सिलिकॉनचा वापर करा. कारण धातूचे लाकूड भांडी खराब करू शकतात.

4. मातीचे भांडे साबण आणि मऊ स्क्रबरच्या मदतीने हलक्या हाताने स्वच्छ करा. ते धुताना काळजी घ्या. कारण चुकीच्या पद्धतीने धुतल्यास किंवा जास्त चोळल्यास ते तुटू शकतात. मातीची भांडी हलक्या हातांनी घासावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com