
अॅपल Apple कंपनीच्या चहात्यांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे कारण अॅपलने आपला नवा कोरा आयफोन 13 आणि आयफोन 13 Pro लाँच केला आहे. आयफोन 13 ला नवीन लुक देण्यात आला आहे. मागच्या बाजूला तिरपे कॅमेरा देण्यात आले आहेत. यात नवीन प्रोसेसर A15 Bionic चिपसेट देण्यात आले आहे. तसेच यावेळी कंपनीने अपडेटेड आयपॅड, वॉच सुद्धा लाँच केली आहे.
हे देखील पहा -
आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनीसाठी डिस्प्ले आकार अनुक्रमे ६.१-इंच आणि ५.४-इंच असणार आहे. Apple iPhone 13 हा नवीन प्रोसेसर A15 Bionic चिपसेटवर चालेल. यात 6-कोर CPU आहे ज्यामध्ये २ हाय परफॉर्मंस कोर आणि ४ इफीशियंसी कोर आहे. यात मशीन लर्निंग साठी 16-कोर न्यूरल इंजिन आहे. कॅमेऱ्यात नवी फिचर देण्यात आले आहे. यात नवीन सिनेमॅटिक मोड देण्यात आला आहे आहे. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना तुम्ही फोकस कमी जास्त देखील करू शकणार आहे. त्याचबरोबर तुम्ही डॉल्बीमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता.तसेच आयफोन 13 Pro सुद्धा लाँच केला आहे.
या फोनमध्ये ३ रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. iPhone 13 Pro मध्ये जास्त ग्राफिक्स आहे. पूर्णक्षमतेने हा फोन चार्ज केल्यावर एक दिवस तुम्ही हा फोन वापरू शकता.आयफोन 13 Pro ची किंमत १०९९ डॉलर पासून सुरू आहे. याची विक्री २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आयफोन-13 ची किंमत ६९९ डॉलर असणार आहे आयफोन 13 प्रोची किंमत ९९९ डॉलर इतकी असणार आहे. आयफोन-13 आणि आयफोन-13 मिनी सुद्धा लाँच करण्यात आला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.