Infertility : पुरुषांमध्ये वाढतीये वंध्यत्वाची समस्या; वाचा सविस्तर

वंध्यत्व हा रोग नाही आजार
Infertility :  पुरुषांमध्ये वाढतीये वंध्यत्वाची समस्या; वाचा सविस्तर
Infertility : पुरुषांमध्ये वाढतीये वंध्यत्वाची समस्या; वाचा सविस्तर Saam tv News

अमेरिकेतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दर आठ जोडप्यांपैकी एक जोडपे वंध्यत्वाला (Infertility) बळी पडत आहे. यातील पुरुषांंध्ये व्यंधत्वाचे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाबही समोर आली आहे. 30 ते 50 टक्के प्रकरणांमध्ये डॉक्टरांना पुरुषांमधील वंध्यत्वाचे कारण शोधू शकत नसल्याचेही समोर आले आहे. (Infertility: the problem of increasing infertility in mens)

Infertility :  पुरुषांमध्ये वाढतीये वंध्यत्वाची समस्या; वाचा सविस्तर
Toxic shock syndrome: मासिक पाळीत टॅम्पॉन वापरणाऱ्या महिलांना धोका

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वंध्यत्वाचे निदान झाल्यावर, कामाचा ताण, मानसिक तणाव, फोन आणि लॅपटॉपचा अतिवापर, प्लास्टिकचा अतिवापर किंवा खाणपाणाच्या चुकीच्या पद्धती, हे सर्व व्यंधत्वांचे कारण आहे का, असा प्रश्न विचारत आहेत. तर त्याच वेळी, वातावरणातील विषारी पदार्थांचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे का, असेही प्रश्न काहीजण उपस्थित करत आहेत.

वंध्यत्व हा रोग नाही आजार

व्यंध्यत्त्वाबाबत इतर काहीही जाणून घेण्याआधी, एक गोष्ट जाणून घेणे फार महत्वाचे आहे की हा एक रोग नाही तर एक समस्या आहे आणि वैद्यकीय शास्त्राकडे देखील या समस्येवर उपायदेखील आहेत.

Infertility :  पुरुषांमध्ये वाढतीये वंध्यत्वाची समस्या; वाचा सविस्तर
निरोगी, लांब आणि मजबूत केसांसाठी करा 'हे' सोपे उपाय

'पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाचे प्रमाण

अलीकडे अमेरिकेत पुरुषांमध्ये व्यंध्यत्त्वाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याची बाब एका सर्वेक्षणातून आढळून आली आहे. महिलांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये व्यंध्यत्त्वाचे प्रमाण सर्वाधिक आढळून येत आहे. वातावरणातील बदल आणि विषारी पदार्थांमुळे पुरुषांमध्ये व्यंध्यत्त्व वाढत आहे का, असा सवाल आता अमेरिकेतील नागरिक विचारत आहेत. साधारणपणे एक वर्ष नियमित शारीरिक संबंध प्रस्थापित करुनही गर्भधारणा होत नाही, अशा जोडप्यांमधील व्यध्यंत्त्वाचे कारण शोधण्यासाठी तज्ञ मंडळी परिक्षण करत आहेत.

'उपचारांची सुरुवात'

वंध्यत्वाची समस्या ही केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शिक्षणाबरोबरच जनजागृती देखील वंध्यत्वामागील एक प्रमुख कारण आहे. जर एखाद्या जोडप्याने योग्य वेळी संबंध प्रस्थापित केले तर गर्भधारणा होऊ शकते. मात्र महिला आणि पुरुषांचे व्यस्त वेळापत्रक हे देखील याचे एक मोठे कारण आहे. ठराविक वयानंतर जोडप्यांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या अधिक सामान्य असतात.

पुरुषांसाठी, वीर्य विश्लेषण हा प्रजननक्षमतेचे मूल्यांकन करण्याचा आधार आहे, तर शुक्राणूजन्यतेचा अंदाज लावण्याच्या अनेक पद्धती आहेत. शुक्राणूंची संख्या एकूण गतिशील शुक्राणुजोआ पाहून मोजली जाते जी पोहणे आणि चालण्यास सक्षम असलेल्या शुक्राणूंच्या अंशांचे मूल्यांकन करते.

समस्या कोणालाही होऊ शकते

भाषेच्या अहवालानुसार, डॉक्टर म्हणतात की लठ्ठपणापासून हार्मोनचे असंतुलन आणि आनुवंशिक रोगांमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अनेक पुरुषांमध्ये उपचाराने व्यध्यंत्वाची समस्या काही प्रमाणात कमी करता येते. परंतू संशोधनानुसार, अनेक जोखीम घटकांवर नियंत्रण करुनही, पुरुषांमधील प्रजननक्षमता काही दशकांपासून वेगाने कमी होत आहे. विविध अभ्यासांमध्ये असे निष्कर्ष काढले गेले की, आज काही पुरुष कमी निरोगी आहेत आणि त्यांच्यामध्ये पूर्वीपेक्षा शुक्राणूंची निर्मिती कमी होत आहे. आता पुरुषांंमधील व्यध्यंत्तवाचे कारण नक्की काय, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

वंध्यत्वाची अनेक कारणे

शास्त्रज्ञांना बऱ्याच गेल्या काही काळापासून, पर्यावरणातील विषारी घटकांमुळे प्राण्यामधील प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. पण त्याच वेळी मनुष्यामध्येही पर्यावरणातील विषारी घटकांचा परिणाम होत आहे का याचे परिक्षम करण्याठी संशोधकांनी वातावरणात असलेल्या धोकादायक रसायनांचा अभ्यास केला. मात्र त्यांना अद्याप या संशोधनात मानवी प्रजननक्षमतेवर पर्यावरणातील विषारी घटकांचा काही परिणाम होत असल्याचे आढळून आलेले नाही.

'पर्यावरणीय विषबाधा'

आजच्या काळात अनेक रसायनांचा सर्रास वापर होत आहे. अमेरिकेत 80 हजारांहून अधिक रसायने नोंदणीकृत आहेत. सध्याच्या व्यवस्थेत या रसायनांमुळे होणारे दुष्परिणाम समोर येण्यास बराच काळ लागतो. रसांयनांचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर ती रसायने बाजारातून हटवली जातात. याविषयी देखील जागरूकता असणे महत्त्वाचे आहे. मात्र व्यध्यंत्त्वाची समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपल्या मनाने कोणतीही औषध न घेण्याचा सल्ला तज्ञ मंडळीनी दिला आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com