ICG Navik Recruitment: भारतीय तटरक्षक दलात २६० जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्जाची तारीख अन् पात्रता

Recruitment for ICG : इंडियन कोस्ट गार्डमध्ये खलाशी पदासाठी भरती केली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार नॉर्थ, वेस्ट ईस्ट, नॉर्थ वेस्ट आणि अदमान आणि निकोबार प्रांत किंवा या क्षेत्रात एकूण २६० जागांवर भरती केली जाणार आहे.
Recruitment for ICG
Recruitment for ICG ANI

Indian Coast Guard Recruitment :

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलात २६० जागांसाठी भरती केली जाणार आहे. खलासी जीडी पदासाठी ही भर्ती होणार असून त्यासंदर्भातील जाहिरात जाहीर करण्यात आलीय. उद्या १३ फेब्रुवारीपासून २०२४ अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करू शकतील. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार joinindiancoastguard.cdac.in या पोर्टलवर अर्ज करू शकतात.

इंडियन कोस्ट गार्डमध्ये खलाशी पदासाठी भरती केली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार नॉर्थ, वेस्ट ईस्ट, नॉर्थ वेस्ट आणि अदमान आणि निकोबार प्रांत किंवा या क्षेत्रात एकूण २६० जागांवर भरती केली जाणार आहे. इंडियन कोस्ट गार्डमध्ये खलाशी पदासाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवारांना अधिकृत भरती पोर्टल joinindiancoastguard.cdac.in वर या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे. उमेदवार २७ नोव्हेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकतात.

काय आहे पात्रता

भारतीय तटरक्षक खलाशी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांसह १०+२ परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय १८ वर्ष ते २२ वर्ष असणं आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म १ सप्टेंबर २००२ आधी तसेच ३१ ऑगस्ट २००६ नंतर झालेला नसावा. दरम्यान जर उमेदवार हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या कॅटेगरीमधील असतील तर त्यांच्या वयोमर्यादेत सूट देण्यात आलीय. या उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वय वर्षाची सूट देण्यात आलीय.

महापालिकेच्या शाळांमध्ये बंपर भरती

मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची मोठी भरती होणार आहे. पालिका शिक्षण विभागाने याबाबतची जाहिरात दिली असून मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी तब्बल १३४२ पदे भरण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या ‘पवित्र’ पोर्टलद्वारे या महिन्याच्या अखेरपर्यंतही ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा आठ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Recruitment for ICG
IDBI Recruitment 2024: पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! IDBI बँकेत ५०० जागांसाठी भरती, वयोमर्यादा किती?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com