गरोदर असणाऱ्या महिलांनी पहिल्या ते नवव्या महिन्यापर्यंत या पदार्थांचा आहारात समावेश करा

आई होण्याचे स्वप्न पाहण्यापासून ते आई होईपर्यंतचा प्रवास हा एका स्त्रीसाठी सुखद अनुभव असतो.
Diet chart for pregnant women, Health tips, Pregnancy tips, diet plan for pregnant women
Diet chart for pregnant women, Health tips, Pregnancy tips, diet plan for pregnant womenब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आई होण्याचे स्वप्न पाहण्यापासून ते आई होईपर्यंतचा प्रवास हा एका स्त्रीसाठी सुखद अनुभव असतो. ज्याक्षणापासून तिला बाळाची चाहूल लागते त्याक्षणापासून त्याच्या शरीरात शारीरिक व मानसिक बदल होत असतात. (Diet plan for pregnant women)

हे देखील पहा -

शरीरात होणाऱ्या बदलापासून तिच्या मनाची व खाण्यापिण्याच्या सवयीत अधिक बदलत असतात. बाळाचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी डॉक्टर आपल्या आहारात अनेक प्रकारचे बदल करतात व काही औषधे देखील आपल्याला खाण्याचा सल्ला ते देतात. बाळाला पोषण मिळण्यासाठी आईने पौष्टिक अन्नपदार्थ खाणे गरजेचे आहे. गर्भवती महिलेच्या आवडी-निवडी यांमुळे योग्य आणि पौष्टिक आहार निवडणे खूप कठीण होऊन बसते. अशावेळी नऊ महिन्यापर्यंत कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करायला हवा हे जाणून घेऊया

१. पहिल्या महिन्यात थंड दूध आणि पौष्टिक आहार घ्यावा. ज्यामध्ये फळे, भाज्या, कडधान्ये आदीचा समावेश असेल.

Diet chart for pregnant women, Health tips, Pregnancy tips, diet plan for pregnant women
Fitness Tips : वर्कआउट करण्याची योग्य वेळ सकाळी की, संध्याकाळी ?

२. दुसऱ्या महिन्यात गरोदर महिलांनी हंगामी फळे, भाज्या, दूध, दही, चपाती खाऊ शकतात. तसेच दुधासोबत चॉकलेट किंवा इतर पावडरचा समावेश करु शकतो. याशिवाय आपल्या शरीरात जीवनसत्त्वे वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीरातील ऊर्जा वाढेल.

३. तिसऱ्या महिन्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ अवश्य घ्यावेत. ज्यामध्ये दही, पनीर, ताक, तूप यांचा समावेश होतो. याशिवाय या महिन्यापासून मध घेणे सुरू करा. रोज थंड दुधात मध घ्या. यामुळे फायदा होईल.

४. चौथ्या महिन्यात दूधासोबत लोणी खाणे फायदेशीर ठरू शकते. ताक पिणे शरीरासाठी चांगले असते त्याचे अवश्य सेवन करावे. तसेच हंगामी फळे (Fruit), भाज्या, सॅलड्स, ज्यूसही घ्या.

५. पाचव्या महिन्यात आपण दूधाचे सेवन व पौष्टिक पदार्थांचे सेवन अवश्य करायला हवे.

६. सहाव्या महिन्यात दूध (Milk), तूप, गोड पदार्थ, गोड फळे, धान्ये इत्यादींचे सेवन करावे.

७. सातव्या महिन्यात भरपूर दूध प्या. यासोबत दुधात तूप टाकूनही सेवन करता येते. या महिन्यात तुपाचे सेवन करावे.

८. आठवा महिन्यात बाळाचे वजन वाढू लागते. या महिन्यात दुधाची लापशी तुपासोबत आपण खाऊ शकतो.

९. नववा महिन्यात शिजवलेला भात तुपासह खाऊ शकतो. माश्याचे सूप देखील पिऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com