स्ट्रेटनर वापरल्यानंतर कोरड्या झालेल्या केसांची काळजी कशी घ्याल

कोरड्या केसांना जपण्यासाठी काही टिप्स.
Hair tips in Marathi, How to take care of dry hair
Hair tips in Marathi, How to take care of dry hairब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्याच्या ट्रेंडनुसाल आपण केसांची विविध रचना करतो. केसांना रंग देण्यापासून ते त्यावर आपली आवडती हेअरस्टाइल करण्यासाठी आपण केसांसाठी काही उपकरणांचा वापर करतो. (Hair tips in Marathi)

हे देखील पहा -

बहुतेक स्त्रिया केस सरळ ठेवण्यासाठी हेअर स्ट्रेटनरची मदत घेतात. हेअर स्ट्रेटनरमुळे केसांना काही काळ चांगला लूक मिळतो पण, केसांवर हेअर स्ट्रेटनर वापरल्याने केस कोरडे आणि खराब होऊ लागतात. हेअर स्ट्रेटनरमधून निघणारी उष्णता केसांचे पोषण कमी करण्यासोबतच त्यांना कोरडे आणि रुक्ष बनवते. केस निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी हेअर स्ट्रेटनर वापरल्यानंतर या सोप्या पद्धतींचा अवलंब करा.

केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी या टिप्स (Tips) फॉलो करा -

१. हेअर स्ट्रेटनर वापरल्यानंतर केस कोरडे होऊन खराब होतात. त्यामुळे सतत आपले केस तुटायला लागतात. अशावेळी आपण केस ट्रिम करून खराब झालेल्या केसांपासून मुक्त होऊ शकतो. तसेच, केस ट्रिम केल्यानंतर केसांच्या वाढीस गती मिळते.

Hair tips in Marathi, How to take care of dry hair
एसीमध्ये बसल्यानंतर त्वचा कोरडी होत असेल तर या टिप्स फॉलो करा

२. हेअर स्ट्रेटनर वापरल्याने केस खूप कोरडे होतात. अशावेळी केसांवर जास्त प्रमाणात शॅम्पू केल्याने केसांवर असणारे मॉइश्चरायझर कमी होऊ लागते आणि केसांचा कोरडेपणा वाढू लागतो. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केस धुणे टाळा.

३. केसांना पुन्हा निरोगी बनवण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी घराबाहेर जाताना केस पूर्णपणे झाका. तसेच, पोहताना स्विमिंग पूलच्या क्लोरीनपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी केसांना सुरक्षित टोपी घाला.

४. केसांची आर्द्रता परत आणण्यासाठी आपण हेअर स्पाची मदत घेऊ शकतो. तर आपण घरच्या घरी डीप कंडिशनिंग ट्रिटमेंट करून केसांना मॉइश्चरायझ करू शकतो. त्यामुळे आपले केस (Hair) मऊ आणि चमकदार होतील.

५. हेअर स्ट्रेटनर वापरल्यानंतर केसांवर सल्फेट असलेले शॅम्पू वापरू नका. त्यामुळे केस गळती सुरु होते. केस स्वच्छ (Clean) करण्यासाठी सल्फेट फ्री शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com