पावसाळ्यात फोनला भिजण्यापासून कसे वाचवाल?

पावसाळा सुरु झाला की, आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Phone care tips, Monsoon Tips & Tricks in Marathi
Phone care tips, Monsoon Tips & Tricks in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पावसाळा सुरु झाला की, आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ऋतूत पावसाच्या पाण्यामुळे खूप नुकसान होते. (Monsoon Tips & Tricks)

हे देखील पहा -

पावसाळा सुरू झाल्यावर आपल्याला आपल्या वस्तूंची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तूंची. या ऋतूमध्ये अनेक महागड्या वस्तू खराब होतात. आपण आपल्या स्मार्टफोनची विशेष काळजी घ्यायला हवी जर तो वॉटरप्रूफ नसेल तर. पावसाच्या पाण्यापासून आपल्या फोनची सुरक्षितता कशी राखावी हे पाहूया.

१. पावसाळ्यात आपल्या स्मार्टफोनला पाण्यात (Water) भिजण्यापासून वाचवण्यासाठी आपण वॉटरप्रूफ ब्लूटूथ इअरबड्स किंवा हेडफोन वापरू शकतो. आजकाल बाजारात वायरलेस हेडफोन्सचा ट्रेंड (Trend) सुरु आहे. मोबाईलला ब्लूटूथद्वारे कनेक्ट करून, आपण मोबाईल बॅगेत ठेवू शकतो. आपला मोबाईलही भिजण्यापासून वाचेल.

Phone care tips, Monsoon Tips & Tricks in Marathi
पावसाळ्यात दरवाज्याचे हँडल जाम झाल्यास या टिप्स फॉलो करा

२. पावसाळ्यात मोबाईलला भिजण्यापासून वाचवण्यासाठी आपण झिप पाउचचा वापर करु शकतो. ज्यामुळे आपला मोबाइल पावसाच्या पाण्याने भिजणार नाही.

३. मोबाईलच्या मॉडेलनुसार आपण वॉटर प्रूफ फ्लिप कव्हर्स बाजारात मिळतात. जर आपण पावसाळ्यात त्यांचा वापर केला तर ते आपल्या मोबाईलला पाण्यात भिजण्यापासून बऱ्याच अंशी वाचवू शकते. इतकंच नाही तर ते मोबाईल स्क्रीनसाठी सेफगार्ड म्हणून काम करते.

४. मोबाईलला टेम्पर्ड ग्लास बसवल्याने त्याची स्क्रीन सुरक्षित राहिल. त्यासाठी पावसाळ्यात मोबाईलला मागील बाजूस लॅमिनेशन करु शकतो आणि आपला फोनही पाण्यात भिजण्यापासून बऱ्याच अंशी वाचू शकतो.

५. बाजारात आपल्याला वॉटर प्रूफ मोबाईल बॅगचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. या पिशवीमध्ये मोबाईलसोबतच काही पैसे आणि आवश्यक कागदपत्रेही ठेवता येतील.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com