Chikpea Dosa: चवदार आणि आरोग्यदायी 'काबुली चणा' चा डोसा कसा बनवायचा, सोपी रेसिपी नोट करा

Chikpea Dosa Recipe: काबुली चण्यामध्ये प्रथिने आणि फायबर असतात. एक कप चणामध्ये १५ ग्रॅम प्रथिने असतात.त्यामुळे चण्याचा डोसा आरोग्यासाठी हेल्दी आहे. याचा आहारात नक्की समावेश करा.
Chikpea dosa
Chikpea dosayandex
Published On

साउथ इंडियन डिशमध्ये प्रत्येकाचा आवडता पदार्थ म्हणजे डोसा. हा सहसा तांदूळ आणि उडीद डाळ मिसळून बनवला जातो. लोक नाष्टयापासून रात्रीच्या जेवणापर्यंत याचा आनंद घेतात. कारण त्यांना पोट भरते आणि स्नॅक म्हणून देखील खाऊ शकतो. डोसा हा सांबार आणि नारळ किंवा शेंगदाणा चटणी बरोबर खाल्ल्यास एक प्रोटीनयुक्त पदार्थ बनतो. परंतु जर तुम्हाला त्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल तर काबुली चणे वापरून डोसा करून पाहा.

एक कप चणामध्ये १५ ग्रॅम प्रथिने असतात. हे मधुमेहास प्रतिबंध करते. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ते रक्तदाबही कमी करते जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चणामध्ये कॅल्शियम, झिंक आणि व्हिटॅमिन के पुरेशा प्रमाणात आढळतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे. इतक्या गुणांनी समृद्ध असलेला चणा डोसामध्ये समाविष्ट केला तर डोसा आणखीनच पौष्टिक होईल. चला जाणून घेऊया चण्यापासून डोसा कसा बनवायचा.

साहित्य

मूग डाळ - २५० ग्रॅम

उडीद डाळ - २५० ग्रॅम

तांदूळ - अर्धा किलो

आले - २ इंच तुकडा

कढीपत्ता - ६ ते ७ पान

मीठ - चवीनुसार

काबुली चणे - ५००ग्रॅम

बेकिंग सोडा - एक चिमूटभर

हळद, गरम मसाला, हिंग - आवश्यकतेनुसार

Chikpea dosa
Guava: हिवाळ्यात पेरू खाण्याची देसी स्टाईल; 'हे' 5 आजार फिरकणारही नाहीत

बनवण्याची पद्धत

मूग डाळ, उडीद डाळ, मसूर आणि तांदूळ एक ते दोन तास भिजत ठेवा. ज्यांना यात भात घालने आवडत नाही त्यांनी यात क्विनोआ घालू शकता. भिजवल्यानंतर या सर्व गोष्टी ब्लेंडरमध्ये आले, कढीपत्ता, मीठ आणि पाणी घालून मिक्स करा. डोसा पीठ तयार आहे. भिजवलेले चणे उकळून घ्या. चिमूटभर बेकिंग सोडा घालून उकळा म्हणजे चणे मऊ होतील.

तेलात मोहरी, मोहरी, तिखट, सुंठ, हिंग आणि कढीपत्ता घाला. आता त्यामध्ये उकडलेले चणे मिक्स करून त्यात हळद व मीठ घालावे. गरम मसाला आणि कोथींबीर घाला आणि चणे हलके ठेचून परतून घ्या आणि २ ते ३ मिनिटे शिजू द्या. डोसा पीठ तयार आहे. तव्यावर पाणी शिंपडून पुसून त्यात एक चमचा तूप पसरवा. डोसाचं बॅटर पसरवा आणि त्यावर चणाच मिश्रण ठेवा. डोसा सोनेरी झाल्यावर दुमडून गरम प्लेटवर सर्व्ह करा.नारळ चणा डाळ चटणी किंवा शेंगदाणा टोमॅटो चटणी सोबत खा.

Edited by - अर्चना चव्हाण

Chikpea dosa
मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने कॅन्सर होतो? डॉक्टरांनी दिलं तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर!

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com