या रेसिपीने ब्रेकफास्टला द्या फ्युजनचा तडका !

नाश्त्यात बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येऊ लागतो
Easy breakfast, Fusion Recipe
Easy breakfast, Fusion Recipeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : नाश्ता हे आपल्या आहारातील महत्त्वाचे जेवण आहे. आपल्या दिवसाची सुरुवात ही चविष्ट पध्दतीने करावी असे सर्वांना वाटते. सामान्यत: आपल्या प्रत्येकाच्या घरात नाश्त्यासाठी ब्रेड, चहा, ज्युस किंवा पोहे यांना प्राधान्य देतो.

हे देखील पहा -

नाश्त्यात बऱ्याचदा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येऊ लागतो. अशावेळी आपल्याला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होत असते. तेव्हा आपण रोज बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना फ्युजनचा तडका देऊन त्याची चव वाढूव शकतो. नेहमीच्या पदार्थाला टेस्टी रुप कसे देता येईल हे पाहूया.

पालक पनीर चीज डोसा

नाश्त्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय जरी असले तरी फ्युजन पदार्थ बनवण्यासाठी पालक पनीर चीज डोसा ट्राय करु शकतो. त्याची चव देखील वेगळे लागेल व आरोग्यदायी देखील असेल.

साहित्य-

तेल (Oil) - १ छोटा चमचा

आले-लसूण पेस्ट - १ छोटा चमचा

पालक प्युरी - २०० ग्रॅम

किसलेले पनीर - ७५ ग्रॅम

चीज - ३ चौकोनी तुकडे

मीठ - चवीनुसार

धने पावडर - १ छोटा चमचा

हळद पावडर - १/२ छोटा चमचा

बारीक चिरलेला कांदा - १ कप

बारीक चिरलेला लसूण - १ छोटा चमचा

बारीक चिरलेली हिरवी मिरची - १ छोटा चमचा

डोश्याचे पीठ आवश्यकतेनुसार

Easy breakfast, Fusion Recipe
युवावस्थेतील व्यक्तींनी आहार कसा घ्यावा ?

कृती -

१. सर्वप्रथम फिलिंग तयार करण्यासाठी कढईत तेल घेऊन चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, हिरवी मिरची व आले लसूण पेस्ट तळून घ्या.

२. नंतर त्यात पालक प्युरी घालून २-३ मिनिटे शिजवून घ्या. धणे पूड, हळद (Turmeric), मीठ घालून मिक्स करा.

३. पॅनमध्ये किसलेले पनीर आणि चीज घालून काही वेळ पुन्हा शिजवून घ्या. फिलिंग तयार होईल.

४. नंतर डोश्याच्या पॅनला तेलाने ग्रीस करा. डोसा पिठ घेऊन तव्यावर गोल आकारात पसरवा. २-३ मिनिटे शिजवून त्यावर तयार फिलिंग पसरवा.

५. डोसा दोन्ही बाजूने बंद करुन त्याचे तुकडे करा व नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com