Choose Perfect Umbrella : अशी निवडा परफेक्ट छत्री; धो धो पावसातही तुम्ही भिजणार नाही

Perfect Umbrella Tips : पावसाळ्यात अनेक व्यक्ती छत्री नीट नसल्याची तक्रार करतात. छत्री तुटते, गंजते किंवा मग त्यातून पाणी गळतं. त्यामुळे आज परफेक्ट छत्री कशी निवडायची याची माहिती जाणून घेऊ.
Perfect Umbrella Tips
Choose Perfect UmbrellaSaam TV

मुंबईसह राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच धांदळ उडाली आहे. अशात सर्व जण आता छत्री घेऊन घराबाहेर पडत आहेत. तसेच काहींनी छत्री खरेदीसाठी दुकानांत गर्दी केली आहे.

Perfect Umbrella Tips
Colour Changing Umbrella: काय सांगता! ठाण्यात मिळतेय जादूई छत्री; पावसाचं पाणी पडताच बदलतोय रंग, पाहा व्हिडिओ

पावसाळ्यात अनेक व्यक्ती छत्री नीट नसल्याची तक्रार करतात. छत्री तुटते, गंजते किंवा मग त्यातून पाणी गळतं. त्यामुळे आज परफेक्ट छत्री कशी निवडायची याची माहिती जाणून घेऊ.

कापड तपासा

छत्री घेताना सर्वात आधी त्याचे कापड तपासून घ्या. हे कापड सिल्क मिश्रित असावे. कापड हाताला पातळ लागत असेल तर ती छत्री घेऊ नका. दुकानदाराला छत्रीवर पाणी ओतून दाखवण्यास सांगा. त्यानंतर खात्री झाल्यावरच छत्री खरेदी करा.

स्टील जाड आहे का तपासा

काही छत्री प्लास्टीकच्या हॅण्डलपासून देखील बनवल्या जातात. अशा छत्री लगेच तुटून जातात. त्यामुळे छत्री घेताना त्याचे हॅण्डल स्टीलचे आहे की नाही ते तपासून घ्या.

बटन चेक करा

छत्री उघडताना त्यासाठी असलेलं बटण नेहमी तपासून घेतलं पाहिजे. अनेकदा बटण खराब होण्याच्या समस्या देखील जाणवतात. त्यामुळे बटन नीट आहे की नाही ते तपासून घ्या.

फोल्डिंग छत्री

जर तुम्ही ऑफिस किंवा कॉलेजसाठी प्रवास करत असाल तर शक्यतो मोठी छत्री घेऊ नका. दुकानात अनेक फोल्डिंग छत्री मिळतात. या छत्रीची सईज देखील मोठी असते. शिवाय ती आरामात बॅगमध्ये सुद्धा ठेवता येते.

Perfect Umbrella Tips
Colour Changing Umbrella: काय सांगता! ठाण्यात मिळतेय जादूई छत्री; पावसाचं पाणी पडताच बदलतोय रंग, पाहा व्हिडिओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com