Coconut Buying Tips : कोणत्या नारळात जास्त आणि गोड पाणी आहे? 'या' ट्रिक्सने ओळखा

Full of Water Nariyal Pani : नारळपाणी निवडताना कुठल्या नारळात जास्त पाणी आहे हे ओळखणं तितकचं जिकरीचं आणि कठीण असतं. म्हणून कुठल्या नारळात जास्त पाणी आहे हे कसं ओळखावं याच्या काही टिप्स.
Full of Water Nariyal Pani
Coconut Buying Tips Saam TV

जूनचा महिना सूरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. त्यात उन्हाचा कहर वाढल्याने सामान्यांची लाही लाही होताना दिसत आहे. अशा वेळी अनेक लोक पाण्यास सरबत, कोल्ड ड्रिंक पिताना दिसताता. अशा रणरणत्या उन्हात स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे थंडगार नारळपाणी.

नारळ पाणी प्यायल्याने तहान तर भागतेच, पण शरीराचे तापमान स्थिरावतं. पण नारळपाणी निवडताना कुठल्या नारळात जास्त पाणी आहे हे ओळखणं तितकचं जिकरीचं आणि कठीण असतं. म्हणून कुठल्या नारळात जास्त पाणी आहे हे कसं ओळखावं याच्या काही टिप्स जाणून घेऊयात.

रंगावरून ओळखा

बाजारात विविध प्रकारचे नारळ असतात. त्यामध्ये काही नारळ ताजे आणि हिरवे दिसतात. तर काही नारळांचा रंग उचरलेला असतो. यामध्ये काही नारळ वरून सुकलेले आणि सुरकुत्या पडलेले सुद्धा दिसतात. जो नारळ वरून थोडा सुकलेला किंवा दव्हाळ रंगाचा दिसतो. त्यात पाणी कमी असतं.

आकारावरून ओळखा

काही व्यक्तींना असं वाटतं की, जितका मोठा नारळ तितकं जास्त पाणी, मात्र तसं नसतं. नारळपाणी घेताना नारळाचा आकार जास्त मोठा नसावा. नारळाचा आकार नेहमी मिडीयम साईजमध्ये असला पाहिजे. कारण जास्त मोठा नारळ असल्यास त्यात मलई जास्त असते. त्यामुळे तुम्हाला पाणी जास्त पाहिजे असेल तर मिडीयम साईजमझध्ये नारळ घ्या.

आवाजावरून ओळखा

फार कमी व्यक्ती आवाजावरून योग्य नारळपाणी ओळखतात. ज्या नारळाचा आवाज येत नाही त्यामध्ये पाणी पूर्ण भरलेलं असतं. तर ज्या नारळात कमी पाणी असतं त्यातून पाण्याचा खळखळ आवाज येतो. त्यामुळे आवाजावरूनही नारळपाणी ओळता येतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com