Umbrella Buying Tips : स्वस्तात मस्त आणि टिकाऊ छत्री खरेदी करताय? मग 'या' टिप्स नक्की वाचा

Monsoon Umbrella : बाजारात एवढे पर्याय उपलब्ध असल्याने मग कोणती छत्री घ्यायची ? असा गोंधळ तुमचाही उडतो का? मग काळजी नका करू आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय.
Monsoon Umbrella
Umbrella Buying TipsSaam TV

श्वेता जोशी

पावसाने चांगलाच जोर धरलाय. मग भिजायला नको म्हणून छत्री तर पाहिजेच. छत्री पण अशी हवी की जी निदान हा एक पावसाळा तरी छान चालेल आणि बजेटमध्ये असणंही आवश्यक आहे. बाजारात कमीत कमी किंमतीपासून ते अगदी हजार रुपयांपर्यतही छत्री मिळतात. फॅन्सी छत्रीपासून ते टिप्पिकल काळ्या छत्रीही उपलब्ध आहेत.

Monsoon Umbrella
Colour Changing Umbrella: काय सांगता! ठाण्यात मिळतेय जादूई छत्री; पावसाचं पाणी पडताच बदलतोय रंग, पाहा व्हिडिओ

बाजारात एवढे पर्याय उपलब्ध असल्याने मग कोणती छत्री घ्यायची ? असा गोंधळ तुमचाही उडतो का? मग काळजी नका करू आम्ही तुम्हाला काही टिप्स देतोय. ज्याने तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे तुमच्या बजेटची छत्री सहज घेता येईल.

1. तुमची गरज आधी समजून घ्या.

तुम्हाला छत्री कशी हवी आहे? फक्त भिजु नये, संरक्षणासाठी म्हणून हवी असेल तर तुम्ही पारंपरिक काळी छत्री घेणं योग्य राहिल. जी मजबूत आणि टिकावू असेल. मात्र जर तुम्हाला छत्री तुमच्या स्टेटससाठी, मिरवण्यासाठी हवी असेल तर बाजारात अगदी 300 रुपयांपासून कलरफुल, डेकोरेटिव्ह अगदी तुमच्या आवडीच्या कस्टमाईज छत्रीही मिळु शकतात. ज्यानी तुम्ही मस्त फोटोसेशनही करू शकता. फक्त त्या मुसळधार किती टिकतील याबाबत खात्री नसते.

2. बजेट फिक्स करून घ्या

छत्रीसाठी किती खर्च करायची तुमची तयारी आहे. हे आधी ठरवून घ्या. मग निवड करणं एकदम सोपं जाईल. ब्रॅंडेड छत्री 700-750 पर्यत उपलब्ध होतील. जी मुसळधार पावसातही तुमची साथ सोडणार नाहीत. जोरदार पावसातही तुमचा बचाव नक्की करेल. मात्र जर कमी बजेट असले तर 300 रुपयांपासून सहज बाजारात छत्री उपलब्ध आहेत. यात तुम्हाला कलर व्हाराईटी मिळेल. वेगवेगळे डिझाईन्सही उपलब्ध आहेत.

3. फोल्डची की मोठी छत्री ?

छत्रीमध्येही 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात करूयात फोल्डिंगच्या छत्रीने.. छोट्या पर्स किंवा बॅगेत राहिल अशी छत्री पाहत असाल तर हा बेस्ट पर्याय तुमच्यासाठी असू शकतो. शिवाय आजकाल अशा छत्रींना प्लॅस्टिकचं कवरही येतं म्हणजे छत्री वापरू झाली की ओली जरी असली तरी आपण पुन्हा सुरक्षित ठेऊ शकतो. दुसरा प्रकार येतो मध्यम आकाराच्या छत्री येतात, जी मोठ्या सॅकमध्ये तुम्ही आरामात ठेवू शकता. तिसरा प्रकार येतो मोठ्या छत्रींचा. जो पूर्वीच्या काळी वापरायचे आता पुन्हा मोठ्या छत्रींचा ट्रेंड आलाय. काळ्या रंगासोबत त्यात वेगवेगळे रंगही बाजारात उपलब्ध आहेत.

Monsoon Umbrella
Umbrella and Raincoat Shopping : पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट; छत्री आणि रेनकोट फक्त २५० रुपयांत!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com