कोरोनाचे XE स्ट्रेन किती धोकादायक? NTAGI प्रमुखाने दिले उत्तर

भारतात देखील XE स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळून आले आहे.
Corona XE Variant news updates
Corona XE Variant news updatesSaamTvNews
Published On

नवी दिल्ली - कोरोनाच्या (Corona) नवीन XE स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच भारतात देखील XE स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात आणखी भीती वाढली आहे. मात्र, XE स्ट्रेनवरील जगभरातील गोंधळादरम्यान राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स येतच राहतील त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये, असे त्यांनी सांगितले आहे. (Corona XE Variant news updates)

तसेच, डॉ. एन. के. अरोरा पुढे म्हणाले की, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट, हा व्हायरच्या इतर अनेक नवीन व्हेरिएंट्सला प्रोत्साहन देत आहे. यामध्ये X सिरिजचे व्हेरिएंट्स आहेत, जसे की XE स्ट्रेन यूकेमधून उद्भवला. परंतु यापैकी कोणताही स्ट्रेन गंभीर नसल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

Corona XE Variant news updates
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा इशारा ४ दिवसांआधीच; खळबळजनक माहिती समोर

कोरोना व्हायरसचे ओमायक्रॉन प्रकार अनेक नवीन रूपांना जन्म देत आहे. जसे की X सिरीजमधील वेरिएंट, त्यापैकी एक म्हणजे XE स्ट्रेन. तसेच भारतात ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या आढळून येत आहे. त्यानुसार हा व्हेरिएंट देशामध्ये वेगाने पसरत नसल्याचे दिसून येत आहेत असे देखील डॉ. एन.के. अरोरा यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com