
लोक वर्षभर रंगांच्या सणाची, होळीची वाट पाहतात. होळी येताच सर्वजण त्याच्या रंगात भिजतात. होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर नात्यांमध्ये गोडवा आणणारा देखील आहे. भारताच्या कोनाकोपऱ्यात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
भारतातील होळी, विशेषः वृंदावन आणि बरसानाची होळी जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी होळीच्या निमित्ताने वृंदावन आणि बरसान येथे होळी खेळण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते.
याशिवाय, भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये होळी खेळली जाते, परंतु तुम्हाला माहित आहे का की होळीचा सण केवळ भारतापुरता मर्यादित नाही. रंगांचा हा सण अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भारताच्या शेजारील देश नेपाळमध्येही होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. तेथे होळी फागु पोर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी नेपाळमधील लोक एकमेकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकुण होली खेळतात.
अनेक मुस्लिम देश देखील होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यामध्ये बांगलादेशाचाही समावेश आहे, तिथे होळी डोल पोर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या वेळी लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात.
पाकिस्तानमध्येही हिंदू लोकसंख्या आहे आणि तेथेही होळी साजरी केली जाते. कराची आणि लाहोरची होळी पाकुस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा दिवस तेथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
काही अमेरिकन शहर आणि युरोपीय राज्यांमध्येही होळी साजरी केली जाते. या वेळी लोक एकमेकांना रंग लावतात, नाचतात आणि गातात.
फिजीमध्येही होळी सादरी करण्याची संस्कृती आहे. येथेही रंगांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि लोक एकमेकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकतात. इंडोनेशियामध्ये होळी हा सण प्रोह्यो म्हणून साजरा केला जातो. या वेळी लोक एकमेकांना गुलाल लावतात आणि नाचतात.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.