Health Tips : कर्करोगापासून बचाव करायचा असेल तर आहारात 'या' गोष्टींचा अवश्य करा समावेश, मिळतील इतरही लाभ 

Tips to prevent cancer : कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा अतिशय झपाट्याने आपले जाळे पसरवतोय.
Tips to prevent cancer
Tips to prevent canceryandex
Published On

भारतात तरूण पिढी कर्करोगाची सर्वाधीक बळी ठरतेय. कर्करोग टाळण्यासाठी ओमेगा-6 आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करावा. अभ्यासातून असे दिसून आले आहे की ओमेगा -6 आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड समृध्द अन्न संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे फॅटी ॲसिड अनेक प्रकारच्या  कर्करोगापासूनही संरक्षण करते.

जॉर्जिया युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्च टीमने 2.50 लाख लोकांवर 10 वर्षे अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की रक्तातील ओमेगा-3 आणि ओमेगा-6 हे 19 प्रकारच्या कॅन्सरशी संबंधित आहेत. याचा अर्थ, मासे आणि सुकामेव्यासारख्या गोष्टीतून मिळणारे हे फॅट्स कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

हेल्दी फॅट्स बनतील कर्करोगासमोर ठाल 

हेल्दी फॅट्स ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. हे मासे, सुकामेवा, एवोकॅडो आणि काही वनस्पती तेल जसे की कॅनोला तेलामध्ये आढळतात.  विशेष गोष्ट अशी आहे की उच्च पातळीच्या फॅटी ऍसिडचे फायदे बीएमआय (बॉडी मास इंडेक्स), अल्कोहोल पिणे किंवा शारीरिक हालचालींसारख्या इतर जोखीम घटकांवर अवलंबून नाहीत. संशोधक संघाने सांगितले की फिश ऑइल शरीरातील हे निरोगी चरबी वाढवण्यास मदत करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात हे फॅट्स वाढवले पाहिजेत.

या प्रकारचे कर्करोग टाळायला मदत होऊ शकते

संशोधकांच्या मते, या फॅटी ऍसिडचे पुरेसे सेवन कर्करोगापासून संरक्षण करू शकते. ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे उच्च प्रमाण कोलन, पोट आणि फुफ्फुसाच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करते. ओमेगा-6 फॅटी ऍसिडचे उच्च प्रमाण मेंदूचा कर्करोग, मेलेनोमा आणि मूत्राशयाचा कर्करोग यासारख्या 14 प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते.

हेल्दी फॅट्स महिलांसाठी अधिक फायदेशीर असतात

संशोधनात असेही आढळून आले की ओमेगा-6 फॅटी ऍसिडस् महिला आणि तरुणांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की ओमेगा-3 आणि ओमेगा-6 च्या संतुलित सेवनाने कर्करोगापासून नैसर्गिक संरक्षण मिळू शकते. पण याबाबत अजून संशोधनाची गरज आहे. या महत्त्वाच्या फॅटी ऍसिडचा आहारात समावेश करावा असे संशोधन सुचवते. यामुळे कर्करोग आणि गंभीर आजार टाळता येतात.

Edited By- नितीश गाडगे

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com